ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारळी पौर्णिमा उत्सव रद्द, पोलिसांच्या विनंतीनंतर पालिकेचा निर्णय - ठाणे नारळी पौर्णिमा उत्सव रद्द न्यूज

दरवर्षी ठाणे महापालिकेच्या वतीने कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या सणाच्यानिमित्ताने कळवा सर्कल, क्रिक नाका ते ठाणे पोलीस मुख्यालयासमोरील रोड, क्रिक नाका ते सिडको रोड येथे भव्य यात्रा भरते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेने हा उत्सव रद्द केला आहे.

Narali purnima festival canceled in thane due to corona crisis
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारळी पौर्णिमा उत्सव रद्द
author img

By

Published : Jul 25, 2020, 6:06 PM IST

ठाणे - दरवर्षी ठाणे महापालिकेच्या वतीने कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या सणाच्यानिमित्ताने कळवा सर्कल, क्रिक नाका ते ठाणे पोलीस मुख्यालयासमोरील रोड, क्रिक नाका ते सिडको रोड येथे भव्य यात्रा भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करणे योग्य होणार नसल्याने महापालिका प्रशासनाने नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करू नये, तसेच त्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती ठाणे नगर पोलिसांच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेने यंदाचा उत्सव रद्द केला आहे.

Narali purnima festival canceled in thane due to corona crisis
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारळी पौर्णिमा उत्सव रद्द

नारळी पौर्णिमेनिमित्त कळवा ब्रीज येथे खाडीत दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी ठाणे शहर व परिसरातील बहुसंख्य कोळी, आगरी बांधव इतर समाजाचे लोक एकत्र येतात. खाडीची पूजा करण्यासाठी तसेच नारळ अर्पण करण्यासाठी या परिसरात या दिवशी साधारण 70 ते 80 हजार नागरिक येतात. नारळी पौर्णिमेनिमित्त कळवा ब्रिज, तारापूरवाला गार्डन, क्रिक नाका सर्कलजवळ पालिका प्रशासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. पालखी मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत 400 ते 500 नागरिक सहभागी होत असतात. यावर्षी 3 ऑगस्टला रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हा सण आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करणे योग्य होणार नाही. तरी ठाणे महापालिका प्रशासनाने नारळी पौर्णिमेनिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये व त्याअनुषंगाने इतर कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देऊ नये, असे विनंती करणारे पत्र ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आर. एम. सोमवंशी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविले होते. त्यानंतर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका प्रशासनानेही यावर्षी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.