ETV Bharat / state

Thane Crime : कुटुंबापासून दूर राहण्याचा हट्ट करणाऱ्या पत्नीचा खून; पती गजाआड - पत्नीचा गळा आवळून खून

पत्नीने कुटुंबापासून दूर राहण्याचा हट्ट केल्याने संतापलेल्या पतीने तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीतील मुंबई-नाशिक पाइपलाइनजवळ घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहे. अब्दुल रहमान बिलाल अन्सारी (वय २६) असे बेड्या ठोकलेल्या पतीचे नाव आहे. तर रमशा अब्दुल रहमान अन्सारी (वय २४),असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

Husband Killed Wife In Thane
पत्नीचा खून
author img

By

Published : Apr 11, 2023, 9:48 PM IST

ठाणे : मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील मुंबई-नाशिक पाइपलाइनजवळ सोमवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सोनाळे गावचे पोलीस पाटील शत्रुघ्न पाटील यांनी या घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व मृतदेहाचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांसमोर अनोळखी महिलेची ओळख पटवणे आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेणे हे आव्हान होते. मात्र रात्री उशिरा पोलिसांना मृत महिलेची माहिती मिळावी यासाठी पोलिस पथकाने काम सुरू केले होते.

पतीने उकलले रहस्य: पोलीस तपासाअंती मृत महिलेचे नाव रमशा अब्दुल रहमान अन्सारी असल्याचे समोर आले. तसेच ती कुटुंबासह भिवंडी शहरातील शांतीनगर भागातील अजमेर चौक भागात राहत होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली. दरम्यान, पतीवर संशयाची सुई फिरवल्यानंतर पोलीस पथकाने मृत महिलेचा पती अब्दुल रहमान बिलाल अन्सारी याला भिवंडीतील बिलाल नगर, येथून पहाटे अडीच वाजता ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान सांगितले की, त्यांच्या वृद्ध वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना सोडून तो वेगळे राहण्यास तयार नव्हता. त्यातच पत्नीने पतीला सासरपासून दूर राहण्याचा वारंवार तगादा लावला होता. मात्र आरोपी पती हा पत्नीच्या वेगळे राहणाच्या तगाद्याला कंटाळला आणि त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला.

हत्येची कबुली: वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता, आरोपी अब्दुल रहमान अन्सारी याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर भिवंडी तालुका पोलिसांनी पत्नीचा मारेकरी अब्दुल रहमान बिलाल अन्सारी याला हत्येप्रकरणी अटक केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Pravin Darekar On Eknath Shinde : ...म्हणून भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले; प्रवीण दरेकरांनी केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.