ETV Bharat / state

मुंब्रा पोलिसांचा तपास बंद, ४०० लोकांचे धर्मांतर वास्तव की अफवा, शाहनवाजचे कुटुंबीय अज्ञात स्थळी - ऑनलाईन धर्मांतर केल्याचा गुन्हा

मुंब्रा पोलिसांचा शाहनवाज प्रकरणी तपास बंद झाला आहे. आता ४०० लोकांचे धर्मांतर वास्तव की अफवा याचा शोध मात्र सुरू झाला आहे. ऑनलाईन धर्मांतरातील आरोपी शाहनवाज याचे कुटुंबीय अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच गुप्तचर यंत्रणा मुंब्र्यात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

मुंब्रा पोलिसांचा तपास
मुंब्रा पोलिसांचा तपास
author img

By

Published : Jun 13, 2023, 10:09 PM IST

ठाणे : ऑनलाईन धर्मांतर प्रकरणी गाजियाबाद पोलिसांनी ठाणे न्यायालयात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कवीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी बद्दो उर्फ शाहनवाज मकसुद खान (२३) याला गाजियाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. मुंब्रा कौसा परिसरात राहणाऱ्या शाहनवाज याचा परिवारही परागंदा झालेला आढळला. त्याच्या घराला टाळे असल्याचे समोर आलेले आहे. त्याचे कुटुंबीय पोलिसांच्या संपर्कात असून ते अज्ञात स्थळी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर ठाणे पोलिसांसह आता गुप्तचर यंत्रणा देखील सतर्क झाल्या असून त्यादेखील मुंब्र्यात ठाण मांडून आहेत.

ऑनलाईन धर्मांतर केल्याचा गुन्हा - गाजियाबाद जिल्ह्याच्या कवीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी शाहनवाज याच्यावर ऑनलाईन धर्मांतर केल्याचा गुन्हा आहे. मुंब्रा कौसा येथे शाहनवाज याला दोन भाऊ आणि आई असा चारजणांचा परिवार आहे. दुसरीकडे गाजियाबादच्या कवीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच शाहनवाज फरारी झाला होता. त्याने गाजियाबाद पोलीस मुंब्र्यात धडकले आणि शाहनवाज याने मुंबई गाठले. त्यानंतर मुंबईच्या वरळी येथून थेट रायगड जिल्ह्यातील अलिबाग गाठले. मात्र नातेवाईकांशी संपर्कात असलेल्या शाहनवाज याने मोबाईल सिम बदलले असले तरीही पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर शाहनवाज याचे लोकेशन शोधून काढले आणि अटक केली.

परिवार परागंदा - सोमवारी आरोपी शाहनवाज याला गाजियाबाद पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर शाहनवाज याच्या मुंब्र्यातील घरातील अन्य परिवार परागंदा झालेले आहेत. त्याच्या राहत्या घराला कुलूप असल्याचे समोर आले. ठाणे पोलिसांनी आरोपी शाहनवाज याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील काही डिव्हाईस आणि अन्य तांत्रिक बाबी हस्तगत केल्या. त्याही तपासासाठी युपी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या.

४०० जणांचे धर्मांतर...अफवा कि वास्तव - धर्मांतर प्रकरणी अटकेतील आरोपी शाहनवाज याने मुंब्रा परिसरात किंवा अन्य ठिकाणी ४०० जणांचे धर्मांतर केल्याची चर्चा ठाण्यात रंगलेली असतानाच प्रत्यक्षात शाहनवाज याने किती लोकांचे धर्मांतर केले हे गुलदस्त्यातच राहिलेले आहे. कारण शाहनवाज याने ४०० जणांचे धर्मांतर केल्याच्या वावड्या उडाल्या. मात्र याबाबत कुठलाही आरोप किंवा पुष्टी मुंब्रा पोलिसांनी किंवा गाजियाबाद पोलीस, कवीनगर पोलिसांनी केलेली नाही. मग धर्मांतर झाले कुणाचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. गाजियाबादमध्ये दाखल गुन्हा हे वास्तव असू शकते. मात्र ४०० लोकांचे धर्मांतर ही अफवा असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. शिवाय मुंब्रा पोलिसांनी गाजियाबाद पोलिसांच्या विनंतीवरून केवळ मुंब्रा येथील आरोपी फरार असल्याने त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करून आरोपी शाहनवाज याला अटक केली. शाहनवाज याला गाजियाबाद पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर मात्र मुंब्रा पोलीस यानी सदर प्रकरणाचा तपास बंद केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणा सतर्क - मागील काही वर्षांपासून मुंब्रा परिसरामध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आपले खबरी कामाला लावले आहेत. शाहनवाजच्या या प्रकारानंतर आता गुप्तचर अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये ठाण मांडले असून सर्व लहान सहान घटना आणि गोपनीय माहितीवर गुप्तचर यंत्रणांनी आपलं लक्ष केंद्रित केलेले आहे.

हेही वाचा..

  1. Gaming App Conversion Case : गेमींग अ‍ॅपद्वारे धर्मांतर करणाऱ्या शाहनवाजला पोलिसांनी नेले गाझियाबादला, दुबई कनेक्शनमुळे आयबी सतर्क
  2. Thane Crime News : 'मोबाईल जिहाद' मास्टर माईंड शाहनवाज पोलिसांच्या जाळ्यात, अलिबाग येथून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.