नवी मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाजाच्या माध्यमातून केली जात आहे. त्या अनुषंगाने आज नवी मुंबईतील माथाडी भवनमध्ये या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 11 तारखेला जर एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परीक्षा केंद्र बंद पाडू, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
हेही वाचा - राज्यातील शाळा आणि अंगणवाडी केंद्राना मिळणार मुबलक पाणी
'ही फक्त माझी भूमिका नसून संपूर्ण समाजाची भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले. माथाडी भवन येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत 11 ऑक्टोबरला जर एमपीएससी परीक्षा घेतल्यास सकल मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व एमपीएससी परीक्षा केंद्र बंद करू,' अशी घोषणा छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीदरम्यान केली. तसेच, पुढील 2 दिवसात सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा. अन्यथा, पुढे काही होईल, त्याला सरकार जबाबदार असेल, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
हेही वाचा - देशात 'या' पदासाठी ९३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध