ETV Bharat / state

Madarsa Student Beaten In Thane: पाठांतर व्यवस्थित नाही म्हणून मदरशात अल्पवयीन विद्यार्थाला जबर मारहाण; व्हिडिओ व्हायरल - Moulavi beaten Minor student in Madarsa

मदरशात शिक्षण घेणारा एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी केवळ पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून मदरशातील मौलवी शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. फहाद भगत नुरी (वय ३२, रा, भरूच , गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या मौलवी शिक्षकाचे नाव असून तो फरार झाला आहे.

Madarsa Student Beaten In Thane
विद्यार्थ्याला मारहाण
author img

By

Published : Feb 28, 2023, 7:33 PM IST

Updated : Feb 28, 2023, 7:47 PM IST

विद्यार्थ्याला मारहाण करताना मौलवी

ठाणे: खळबळजनक बाब म्हणजे, त्या अल्पवयीन विद्यार्थाला ७० सेकंदात ७० काठीचे फटके मारताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तीन महिन्यानंतर निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार मौलवी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाठांतर व्यवस्थित होत नसल्याने मारहाण: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ वर्षीय पीडित विद्यार्थी हा भिवंडी शहरातील मिल्लत नगर भागात असलेल्या 'दारुल उलूम हसनैन करीमॅन दिनी' मदरशात शिक्षण घेत आहे. त्यातच २४ नोव्हेंबर २०२२ रोजी नेहमीप्रमाणे मदरशात सकाळच्या सुमारास गेला होता. त्यावेळी आरोपी मौलवी शिक्षकाने त्याला पाठांतर करण्यासाठी सांगितले होते. मात्र पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून मदरशातील मौलवी शिक्षकाने त्याला अमानुषपणे काठीने बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर जखमा केल्या. मात्र हा बेदम मारहाणीचा प्रकार त्यावेळी दडविण्यात आला होता. तर दुसरीकडे जखमी विद्यार्थावर उपचार सुरू होते.

फरार शिक्षकाचा शोध सुरू: विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर म्हणजे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मिल्लत नगर मधील दर्गा ट्रस्टी नूरअली हसन अली सय्यद ( वय ६३) यांच्या तक्रारीवरून मौलवी शिक्षकाविरोधात भादंवि कलम (मुलांची काळजी व संरक्षण ) २०१५ चे कलम ७५ प्रमाणे आणि ३२४, ३२३, कालमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी मौलवी शिक्षक फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस पथक घेत असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. के. दळवी यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. के. दळवी करीत आहेत.

भोपाळमध्ये विद्यार्थ्याला मारहाण: भोपाळ एमपी नगर येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना 22 ऑगस्ट, 2022 रोजी समोर आली होती. 16 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक एका मुलाला लाच घेऊन शिक्षण घेत असताना मारहाण करताना दिसत होते. भोपाळच्या जेईई कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली तेव्हा दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याचा व्हिडिओ बनवला. शिक्षक विद्यार्थ्याच्या पाठीवर कसे ठोसे मारत आहेत आणि विद्यार्थी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी माहिती देताना कोचिंगच्या आणखी एका शिक्षिकेने सांगितले की, दोन मुलांमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून भांडण झाले. अशावेळी एकाने दुसऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर तेथे उपस्थित शिक्षकाने विद्यार्थ्याला धक्काबुक्की केली.

उशीर झाल्याने मारहाण: जिल्ह्यातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना शुल्लक कारणावरून शिक्षकाने बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी इंग्रजीचे शिक्षक एम. एम. वरभे यांना नवोदय प्रशासनाने मंगळवारी निलंबित केले. निलंबन काळात त्यांना मुख्यालय प्रादेशिक कार्यालय पुणे देण्यात आले होते. १९ जानेवारी, 2020 रोजी इयत्ता नववीत शिकणारे आर्यन वालदे, मंगलदीप चुनारकर व साहिल देव्हारे हे तिघेही रविवार असल्याने शाळेतून केस कापायला केस कर्तनालयात गेले होते. मात्र, येताना अर्धा तास उशीर झाला म्हणून शिक्षक वरभे यांनी गावात येऊन देव सलून समोर विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती.

हेही वाचा: Sisodia Jain Resign : मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; सिसोदियांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

Last Updated : Feb 28, 2023, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.