ठाणे - भिवंडी शहरातील एका घराच्या खोलीत गांजा साठविल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या ( Crime Branch ) पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला असता सुमारे 74 किलोंहून अधिक गांजा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त ( Hemp Seized in Bhiwandi ) आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गांजा तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. कमल हसन रजा उर्फ गुड्डू अन्सारी (वय 34 वर्षे), असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे.
16 लाख 37 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमली पदार्थ तस्कर कमल हसन रजा उर्फ गुड्डु अन्सारी हा भिवंडी शहरातील फातमा नगरमध्ये राहतो. तस्कराने फातमा नगर येथे राहत असलेल्या घरातील एका खोलीत अवैध गांजा साठवला असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखा युनिट-2 ( Crime Branch ) यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने फातमा नगर, मैदानाच्या बाजूला असलेल्या कमल हसन याच्या घरावर छापा माराला. त्यावेळी त्यांच्या घरातुन एकूण वजन 74 किलो 624 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, रोख रक्कम व मोबाईल फोन, असा एकूण 16 लाख 37 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.
तस्कराला 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पोलीस पथकाने मुद्देमाल पंचनामा करून गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्यात ( Shanti Nagar Police ) गुन्हा दाखल करण्यात आला असून तस्कराला आज (शनिवारी) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उप निरीक्षक शरद बरकडे, पोलीस उप निरीक्षक रमेश शिंगे, सहायक पोलीस उप निरीक्षक रामसिंग चव्हाण, सहायक पोलीस उप निरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, पोलीस हवालदार रामचंद्र जाधव, पोलीस हवालदार अरूण पाटील, पोलीस नाईक साबीर शेख , सचिन जाधव, रंगनाथ पाटील आदींनी केली आहे.
हे ही वाचा - Couple Commits Suicide : दुर्गाडी पुलावरून खाडीत उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या