ETV Bharat / state

मनसेच्या अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत कोठडी, पालकमंत्री शिंदेच्या विरोधात घोषणबाजी

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली होती. ठाणे मनपासमोर आंदोलन करीत असताना खंडणीविरोधी पथकाद्वारे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर, शुक्रवारी रात्री उशिरा कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांच्यासह दोघा सहकाऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणणे तसेच, सरकारी वास्तूत घुसखोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज (शनिवार) ठाणे सत्र न्यायालयाने जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

author img

By

Published : Aug 1, 2020, 6:53 PM IST

MNS leader Avinash Jadhav remanded in police custody till Monday
मनसेच्या अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत कोठडी

ठाणे - मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली होती. ठाणे मनपासमोर आंदोलन करीत असताना खंडणीविरोधी पथकाद्वारे त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांच्यासह दोघा सहकाऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणणे तसेच, सरकारी वास्तूत घुसखोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज (शनिवार) ठाणे सत्र न्यायालयाने जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्यातून न्यायालयात नेताना मनसैनिकांनी त्यांच्यावर चक्क फुले उधळली. यावेळी न्यायालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. ठाणे महापालिकेच्या कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केल्याने शुक्रवारी मनसेने पालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडले होते. यावेळी, आंदोलन चिरडण्यासाठी ठाणे खंडणी विरोधी पथकाने जाधव यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कापुरबावडी पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर, जाधव यांना पोलिसांनी अटक करून शनिवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जाधव व दोघा सहकाऱ्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयात आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, जाधव यांच्या वकीलांनी, न्यायालयात दोन्हीकडून युक्तीवाद झाल्याचे सांगून, राजकीय आकसापोटी ही कारवाई असून पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने 353 या कलमाचा गैरवापर केला जात असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले. तसेच, सोमवारी न्यायालयीन कोठडीनंतरच जामिनासाठी अपील करणार असल्याचे सांगितले. तर, तडीपारीचा विषय वेगळा असून त्या नोटीसला 4 ऑगस्टपर्यंत उत्तर देऊन स्पष्टीकरण दिले जाणार असल्याचेही जाधव यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.

अविनाश जाधव यांना अटक झाल्याने शनिवारी मनसेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात धाव घेत या कारवाईचा धिक्कार केला. मनसेने केलेले आंदोलन म्हणजे, कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरुपाचा खटला नाही. कोविडसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी जाधव यांनी आंदोलन केले. केवळ आकसापोटी सदरची कारवाई केल्याचे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले. सरकार कोकणवासीयांकडे लक्ष देत नसल्यामुळे मनसे काम करत असल्याचेही सरदेसाई म्हणाले. मनसेच्या संदीप देशपांडे म्हणाले की, हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा डाव आहे. अविनाश जाधव यांनी जे केलं त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आम्ही कुठेही चुकलो नाही, या सरकारच्या मोगलाई विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्रात पालाथ घालू. इथल्या मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, सुशांत सिंहसारख्या केसमध्ये इन्व्हेस्टीगेश करत नाही. नको तिथे गुन्हे दाखल करता, आयुक्तांना जाब विचारायचं नाही का? आंदोलन करायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.