ठाणे : मुंब्रा येथील डोंगरावर अनधिकृतपणे मशिदी बांधण्यात आल्या आहेत. याबाबत शासनाला पूर्वसूचना मनसेच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन देण्यात आले असून, यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी या निवेदनामधून करण्यात आलेली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्क्रीनवर माहिमच्या समुद्रात एका बेटसदृश जागेत एक मजार तयार करण्यात आल्याचा व्हिडीओ दाखवला होता.
राज ठाकरेंनी दिला होता अनधिकृत मजारीचा संदर्भ : त्याचबरोबर या मजारीला भेट देण्यासाठी अनेक लोकांची ये-जा सुरू असल्याचेही त्यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत सांगितले होते. तसेच या ठिकाणी दुसरे हाजीआली तयार होत असल्याचा आरोप करीत शासनाचे दुर्लक्ष असले की, असे अनधिकृत बांधकामाचे प्रकार होत असतात असा आरोपही केला होता. त्यानंतर आज त्या बांधकामावर कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.
मंदिर बांधण्याचा मनसेचा इशारा : अशातच ठाण्यातील मुंब्रा परिसरात सध्या झपाट्याने अनधिकृतरित्या मशिदीचे बांधकाम करण्यात येत आहे. यासंदर्भात मनसे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा १५ दिवसांनंतर मंदिर बांधण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकारी यांना निवेदन देताना मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे इतर मनसैनिक उपस्थित होते.
मुंब्रामध्ये होतो तणाव निर्माण : मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या आश्चर्यानंतर मुंब्रामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अशाच प्रकारचा तणाव आता पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मुंब्रा परिसर हा मुस्लिमबहुल परिसर असून, मुंब्रा देवी ही उमऱ्यातल्या डोंगरावर आहे आणि या देवीच्या मार्गाजवळच यांनी हे अधिकृत बांधकाम करण्यात आले असल्यामुळे मनसेदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वनविभागाचा हलगर्जीपणा : मुंब्रा परिसरामधील वनविभागाची जागा जी आहे, यावर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण होत आहे. वनविभागाच्या हद्दीत कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेला वनविभागाची परवानगीदेखील लागत असते. त्यामुळे वनविभाग त्यांच्या जागेत जर लक्ष देऊ शकत नसेल, तर महानगरपालिकादेखील कशी कारवाई करणार असा सवाल पालिका अधिकारी विचारत आहेत. जर वनविभागाने या गोष्टीची गंभीर दखल त्यांनी घेतली आणि त्यांच्या जागा सुरक्षित केल्या तर असे अतिक्रमणा होणार नाहीत असे महापालिका अधिकारी सांगत आहेत.
मनसे आणि आव्हाड पुन्हा एकदा आमने-सामने : मशिदींवरील भोंग्याच्या संदर्भामध्ये आंदोलन हाती घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान दिले होते. त्यामुळे आव्हाड आणि मनसेचा सामना ठाण्यात पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा अवैध बांधकामांच्या निमित्ताने मनसे आणि आव्हाड पुन्हा एकमेकांच्या विरोधात आमने-सामने उभे टाकलेले आहेत.