मीरा भाईंदर (ठाणे) - टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर शहरातील दुकाने उघडण्यास सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रशासनाने परवानगी दिली. मात्र, लॉजींग-बोर्डिंगसाठी पूर्ण वेळ मग सामान्य दुकानांवर वेळेचे बंधन का असा प्रश्न व्यापारी विचारत आहे. वेळेत बदल करून निदान रात्री १० पर्यंत परवानगी द्यावी. येणाऱ्या १० दिवसाची वेळ प्रशासनाला दिली आहे. वेळेत बदल न झाल्यास मनपा मुख्यालयात व्यापारी वर्गाला घेऊन आत्मदहन करणार असा इशारा मनसे कामगार आघाडीचे उपाध्यक्ष संदीप राणे यांनी दिली.
शहरातील दुकाने नियमित उघण्याची परवानगी दिली आहे. मात्र, वेळ वाढवण्यात यावी, अशी मागणी आम्ही मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली आहे. प्रशासनाला १० दिवसाचा वेळ दिला आहे. अन्यथा व्यापारी वर्गाला घेऊन मनपा मुख्यालयात आत्मदहन करणार, असा इशारा मनसे कामगार आघाडीचे उपाध्यक्ष संदीप राणे यांनी दिला.