ETV Bharat / state

डोंबिवलीत बाप्पासाठी साकारला 'चांद्रयान - 2'चा देखावा - ठाणे बातमी

मानपाडा रोडवर सांगाव येथे असलेल्या गोपाळकृष्ण मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना स्थापनेपासून दरवर्षी समाजाभिमुख देखावे सादर केले जातात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज जागृतीची अपेक्षा व्यक्त केली होती.

डोंबिवलीत साकारला मिशन चंद्रयान - 2 चा देखावा
author img

By

Published : Sep 6, 2019, 8:21 PM IST

ठाणे- डोंबिवलीमध्ये गोपाळककृष्ण मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना इस्रोच्या चांद्रयान- 2 मोहिमेचा हुबेहूब देखावा साकारला आहे. इस्रोने अवकाशात सोडलेल्या चांद्रयानाची तंतोतंत प्रतिकृती या भागातील तरुण मंडळींनी साकारली आहे. ती पाहण्यासाठी गणेशभक्तांसह विज्ञान व अंतराळप्रेमींची झुंबड उडाली आहे.

हेही वाचा-ठाण्यात 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे बाप्पाची स्थापना

मानपाडा रोडवर सांगाव येथे असलेल्या गोपाळकृष्ण मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना स्थापनेपासून दरवर्षी समाजाभिमुख देखावे सादर केले जातात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज जागृतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच धर्तीवर यंदा या मंडळाने चांद्रयान - 2 हा माहितीपूर्ण देखावा साकारला आहे. मंडळातील तरुणांनी उभारलेल्या कलाकृतींमध्ये GSLV MK III, GSLV MK II, PSLV, ASLV, SLV अशा विविध प्रकारच्या प्रक्षेपक यानांचा समावेश आहे. त्याचबरोबर चांद्रयान - 2 चे Orbiter, Vikram - Lander आणि Pragyan - Rover असे महत्त्वाचे 3 भाग बनविण्यात आले आहेत. शिवाय 6 मिनिटांचा अतिशय माहितीपूर्ण माहितीपट सादर करण्यात आलेला आहे.

हा उपक्रम शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन देणारा ठरला असल्याचे मंडळाचे सचिव अभिजीत येवले यांनी सांगितले. यामध्ये इस्त्रो या आपल्या अंतराळ संशोधन संस्थेचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानात भर पडावी, यासाठी विज्ञान-अंतराळप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी. सदर प्रदर्शन 9 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 6 ते 11 या वेळेत पाहता येणार आहे. प्रतिसाद मिळाल्यास प्रदर्शनाची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सचिन म्हात्रे यांनी सांगितले.

Intro:kit 319Body:डोंबिवलीत साकारला मिशन चंद्रयान - 2 चा देखावा

 ठाणे :डोंबिवलीमध्ये इस्रोच्या मिशन चंद्रयान - 2 चा हुबेहूब देखावा साकारण्यात आला आहे. इस्रोने अवकाशात सोडलेल्या चंद्रयानाच्या तंतोतंत प्रतिकृती या भागातील तरूण मंडळींनी तयार केल्या असून त्या पाहण्यासाठी गणेशभक्तांसह विज्ञान व अंतराळप्रेमींची झुंबड उडाली आहे.   
मानपाडा रोडला सांगाव येथे असलेल्या गोपाळकृष्ण मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना स्थापनेपासून दरवर्षी समाजाभिमुख देखावे सादर केला जात आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज जागृतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच धर्तीवर यंदा या मंडळाने चांद्रयान - 2 हा माहितीपूर्ण देखावा साकारला आहे. मंडळातील तरूणांनी उभारलेल्या कलाकृतींमध्ये GSLV MK III, GSLV MK II, PSLV, ASLV, SLV अशा विविध प्रकारच्या प्रक्षेपक यानांचा समावेश आहे. त्याच बरोबर चांद्रयान - 2 चे Orbiter, Vikram - Lander आणि Pragyan - Rover असे महत्वाचे 3 भाग बनविण्यात आले आहेत. शिवाय 6 मिनिटांचा अतिशय माहितीपूर्ण माहितीपट सादर करण्यात आलेला आहे.
हा उपक्रम शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन देणारा ठरला असल्याचे मंडळाचे सचिव अभिजीत येवले यांनी सांगितले. यामध्ये इसरो या आपल्या अंतराळ संशोधन संस्थेचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानात भर पडावी, यासाठी विज्ञान-अंतराळप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी. सदर प्रदर्शन 9 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 6 ते 11 या वेळेत पाहता येणार आहे. प्रतिसाद मिळाल्यास प्रदर्शनाची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सचिन म्हात्रे यांनी सांगितले.Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.