मीरा भाईंदर (ठाणे) - महानगरपालिका हद्दीत गेल्या अनेक दिवसात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत घट झाली. त्यामुळे पालिकेतील आरोग्य विभाग सुस्त झाल्याचे दिसून आले आहे. आज प्रभाग समिती २ मध्ये मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात मीरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट झाली असली तरीही दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारू शकत नाही.
पालिका प्रशासनाकडून नियम पायदळी -
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या नियमाचे पालन पालिका प्रशासन करताना दिसत नाही. रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार सुरू झाला आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करताना कुठेही दिसली नाही. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाटेच्या भीतीपोटी पालिका प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण अशी टीका होत आहे.
भाईंदर पश्चिममधील प्रभाग समिती दोनमध्ये थातूरमातूर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, इतर समित्यांमध्ये प्रभाग अधिकारी सुस्त असल्याचे दिसून येत आहे. मीरा भाईंदर मनपालगत असलेल्या मुंबई, ठाणे महानगरपालिकामध्ये प्रत्येक दिवशी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई सुरू आहे. परंतु, मीरा भाईंदर मनपा कर्मचारी, अधिकारी रुग्ण संख्येत वाढ झाली पाहिजे याची वाट तर बघत नाही ना? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
या संदर्भात मनपा अधिकारी यांना विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच आतापर्यंत किती व्यक्तींविरोधात कारवाई केली यांची माहिती उपलब्ध नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - ईडी काय इंटरपोलला आणा आम्ही घाबरत नाही, संजय राऊतांचा भाजपला इशारा
हेही वाचा - प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचा छापा; शिवसेनेचे आणखी नेते रडारवर..