ETV Bharat / state

मध्य रेल्वेचा कल्याण-ठाणे-पनेवल दरम्यान उद्या मेगा ब्लॉक

author img

By

Published : Jun 12, 2021, 4:54 PM IST

मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घोषित केला आहे.

मुंबई लोकल ट्रेन न्यूज
मध्य रेल्वेचा कल्याण-ठाणे-पनेवल दरम्यान उद्या मेगा ब्लॉक

ठाणे - मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रविवारी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासासाठी इतर वाहनांचाही आधार घ्यावा लागणार आहे.

रविवारी असे असेल वेळापत्रक

ठाणे- कल्याण अप व डाऊन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ या वेळेतील वाहतूक सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ दरम्यान मुलुंड येथून सुटणारी डाऊन धिम्या /अर्धजलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाईल आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून वेळापत्रकपेक्षा १० मिनिट उशिराने धावतील तसेच कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणारी अप धीम्या /अर्धजलद सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानक येथे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. याही गाड्या वेळापत्रकापेक्षा १० मिनिट उशिराने इच्छित स्थळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोहचविणार असल्याचे सांगण्यात आले.

या मार्गावर उद्या मेगा ब्लॉकमुळे लोकल सेवा केल्या रद्द

पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ दरम्यान (बेलापूर / नेरुळ-खारकोपर सेक्शनसह) अप हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणा-या सेवा व डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा ठाणे करीता पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणा-या सेवा आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल करीता ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणा-याही लोकल सेवा रद्द करण्यात आली . तर बीएसयू अप मार्गावर खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत नेरुळ/बेलापूरसाठी सुटणारी सेवा आणि बीएसयू डाऊन मार्गावर नेरुळ/बेलापूरसाठी येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणारी सेवा रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वाशी विभागात विशेष गाड्या चालवल्या जातील. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे- वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर करीत असल्याचेही मध्य रेल्वे, जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.