ETV Bharat / state

भिवंडीत कोरोनाचा कहर वाढला; महापौरांनी घेतला जनता कर्फ्यूचा निर्णय

author img

By

Published : Jun 15, 2020, 7:36 PM IST

भिवंडीत आतापर्यंत कोरोनाचे 570 रुग्ण आढळले असून त्यापैकी 180 रुग्ण बरे झाले आहेत. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 369 रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, यंत्रमाग नगरी म्हणून ओळख असलेल्या या शहरातून बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांतील सुमारे दोन लाखांच्यावर कामगार गेल्या दोन महिन्यांत आपल्या मूळगावी परतले आहेत. हेच कामगार आजही शहरात वास्तव्यास असते तर, कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहावयास मिळाले असते.

Bhiwandi
महापौर प्रतिभा पाटील

ठाणे - मालेगाव प्रमाणेच दाटीवाटीचे शहर असलेल्या भिवंडीत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे महापौर प्रतिभा पाटील यांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या दोन दिवसांत सर्व नगरसेवकांची विशेष महासभा आयोजित करून त्या सभेत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

भिवंडी शहरात आतापर्यंत कोरोनाचे 570 रुग्ण आढळले असून त्यापैकी 180 रुग्ण बरे झाले आहेत. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 369 रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, यंत्रमाग नगरी म्हणून ओळख असलेल्या या शहरातून बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील सुमारे दोन लाखांच्यावर कामगार गेल्या दोन महिन्यांत आपल्या मूळगावी परतले आहेत. हेच कामगार आजही शहरात वास्तव्यास असते. तर कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहावयास मिळाले असते. मात्र लॉकडाऊनच्या काळात यंत्रमाग नगरी ठप्प झाल्याने लाखोच्या संख्येने कामगारवर्ग त्यांच्या मूळगावी गेला. त्यामुळेही काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला.

सर्वसामान्य व गरिबांना उपचारासाठी असलेल्या एकमेव स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोविड 19 रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे सध्याच्या स्थितीत शहरातील सर्वसामान्य गरीब रुग्णांची परवड होताना दिसत आहे. शिवाय हे रुग्णालय 100 बेडचे असल्याने आजच्या घडीला तेही कोरोनाबाधित रुग्णांनी हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता, पोगाव येथील एका भल्यामोठ्या गोदामात 350 बेडचे नवे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासनाची मान्यता मिळवण्याचे प्रयत्न पालिका प्रशासन करीत आहेत.

भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून रविवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे 100 रुग्ण आढळले आहेत. तर शहरातील वाढत्या कोरोनाबधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले असून शहरात काही दिवसांचा लॉकडाऊन घोषित करावा, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली होती. त्यामुळे येत्या दोन दिवसांत भिवंडीत पंधरा दिवसाचा कडक लॉकडाऊन राबवण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली. यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.