ETV Bharat / state

...म्हणून वाशी 'एपीएमसी'तील माथाडी कामगारांचे आंदोलन - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बातमी

माथाडी कामगारांवर पन्नास किलोग्रॅमपेक्षा जास्त भार टाकू नये, असा शासन नियम आहे. मात्र, या नियमाला वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा व्यापाऱ्याकडून केराची टोपली दाखवली असून कामगारांवर जास्त भार देण्यात येते. याविरोधात माथाडी कामगारांनी बंद पुकारला असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

photo
फोटो
author img

By

Published : Mar 4, 2021, 4:55 PM IST

Updated : Mar 4, 2021, 5:08 PM IST

नवी मुंबई - पन्नास किलोपेक्षा जास्त अधिक वजनांचा भार माथाडी कामगारांवर टाकू नये, असा नियम असतानाही नवी मुंबईतील वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या नियमांचे काही व्यापाऱ्यांकडून उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे आज (दि. 4) कांदा-बटाटा मार्केटमध्ये माथाडी वर्गाने कामबंद आंदोलन पुकारले आहे.

माहिती देताना

50 किलोपेक्षा अधिक भार व्यापारी वर्गाला सोसावा लागत आहे

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी आणलेल्या मालाचे वजन 50 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन असू, नये असा शासनाने नियम केला आहे. हा नियम मसाला, फळ-भाजी व्यापारी पाळतात. मात्र, या नियमाला कांदा-बटाटा मार्केटमधील केराची टोपली दाखवण्यात आली असून पन्नास किलोपेक्षा जास्त भार येथील माथाडी कामगारांवर टाकला जातो. यामुळे माथाडी कामगार वर्गाने कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

संप व्यापाऱ्यांनी केला आहे

याबाबत माथाडी कामरांचे खजिनदार गंगा पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आजचा संप माथाडी कामगारांचा नसून व्यापाऱ्यांनीच आज दुकाने उघडली नाही. त्यामुळे आजचा संप हा व्यापाऱ्यांचा आहे.

हेही वाचा - ऐरोलीमध्ये घरफोडी; चोरट्यांनी चार लाखांचे सोने केले लंपास

Last Updated : Mar 4, 2021, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.