ठाणे - लोकलचा प्रवास करण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या बाहेर तिकीटांसाठी भल्यामोठ्या रांगा 2 दिवसांपूर्वी लागल्या होत्या. या रांगा लावताना कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग ठेवले गेले नव्हते. ही बातमी समोर आल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासन जागे झाले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्थानकाच्या बाहेर सुरक्षित अंतराचे मार्किंग करायला सुरुवात केली आहे.
आता तिकिटांच्या रांगेसाठी दिलेल्या मार्किंगवर उभे राहावे लागेल. त्यामुळे सुरक्षित अंतर राखले जाईल. प्लॅनिंग नसल्यामुळे लोकल पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. या गोंधळामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला. मात्र, त्यानंतर सीएसएमटी स्थानकात देखील लोकलमध्ये चढण्यासाठी मार्किंग केल्याचे मध्य रेल्वेने सांगितले, तर ठाण्यात देखील तिकिट खिडकीसमोर रांगेत उभे राहण्यासाठी मार्किंग केल्याचे दिसून आले आहे.