ETV Bharat / state

वैद्यकीय प्रवेश: मराठा विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राज यांचेकडून मदतीचे आश्वासन

मनसेच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता कार्यशाळेसाठी राज ठाकरे ठाण्यात आलेले असताना काही विद्यार्थांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन सर्व विषय समजावून सांगितला.

author img

By

Published : May 13, 2019, 8:57 PM IST

मराठा विद्यार्थी राज ठाकरेंना भेटले

ठाणे - वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तर ठाण्यात मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्ठमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले, यावेळी आपण योग्य त्या ठिकाणी बोलून विद्यार्थ्यांना सहकार्य करू, असे आश्वासन राज यांनी दिले.

मराठा विद्यार्थी राज ठाकरेंना भेटले

यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन छेडले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सोमवार हा सातवा दिवस होता. मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून देण्यात आला.
दरम्यान, मनसेच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता कार्यशाळेसाठी राज ठाकरे ठाण्यात आलेले असताना काही विद्यार्थांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन सर्व विषय समजावून सांगितला. यावर आपण योग्य ठिकाणी बोलून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन राज यांनी विद्यार्थ्यांना दिले.

Intro:मराठा विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंनी भेटBody:वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली तर ठाण्यात मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्ठमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले यावेळी आपण योग्य त्या ठिकाणी बोलून विद्यार्थ्यांना सहकार्य करू असे आश्वासन राज यांनी दिले.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनमध्ये तीव्र असंतोष पसरला असून त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन छेडले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सोमवार हा सातवा दिवस होता . जर मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा देखील इशारा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय.दरम्यान मनसेच्या कार्यकर्ता राज्यस्तरीय कार्यकर्ता कार्यशाळेसाठी राज ठाकरे ठाण्यात आलेले असताना काही विद्यार्थांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन सर्व विषय समजावून सांगितला आणि त्यांना एक निवेदन दिले. यावर आपण योग्य ठिकाणी बोलून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन राज यांनी विद्यार्थ्यांना दिले.
Byte विध्यार्थीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.