ETV Bharat / state

Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, आरक्षण देणार पण... - reservation to Maratha community

Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (22 ऑक्टोबर) पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत मोठ विधान केलंय.

Eknath Shinde On Maratha Reservation
Eknath Shinde On Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 9:18 PM IST

माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : Eknath Shinde on Maratha reservation : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. मराठा आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण देण्याचा आमच्या सरकारचा निर्धार आहे. आम्ही कोणालाही खोटं आश्वासन दिलेलं नाही. कायमस्वरूपी आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. याशिवाय समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन देखील शिंदे यांनी केलंय.

आरक्षणासाठी आणखी वेळीची गरज : मराठा समाजाला आधी आरक्षण दिलं होतं, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर आमच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला आणखी काही काळ हवा आहे. त्यामुळं आंदोलकांनी स्वतःचा, कुटुंबाचा विचार करायला हवा. आरक्षणासाठी वाट्टेल ते करायला आम्ही तयार आहोत. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

विरोधकांनी सूचना कराव्यात : आरक्षणाचं विरोधकांनी राजकारण न करता उपयुक्त सूचना कराव्यात, असं शिंदे म्हणाले. आत्महत्या केलेल्या दोन्ही तरुणांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मराठा संघटना आक्रमक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सभा, मोर्चे सुरू केले आहेत. जालन्यातील मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, अशी मागणीही जरांगे पाटलांनी केली आहे. तसेच सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत मुदत जरांगे पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; सरकारला शेवटचा इशारा
  2. Maratha Youth Suicide : मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन; नांदेडच्या घटनेनं राज्यभरात खळबळ
  3. Nitesh Rane : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू मांडावी - नितेश राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.