ETV Bharat / state

सोमवारी थेट मंत्रालयावर धडकणार 'मराठा क्रांती ठोक मोर्चा'

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. त्यामुळे, सोमवारी थेट मंत्रालयावर 'मराठा क्रांती ठोक मोर्चा' धडकणार असल्याची माहिती मोर्च्याचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सोमवारी थेट मंत्रालयावर धडकणार 'मराठा क्रांती ठोक मोर्चा'
author img

By

Published : Aug 25, 2019, 8:12 PM IST

ठाणे - मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. त्यामुळे, सोमवारी थेट मंत्रालयावर 'मराठा क्रांती ठोक मोर्चा' धडकणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सोमवारी थेट मंत्रालयावर धडकणार 'मराठा क्रांती ठोक मोर्चा'

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून हा मोर्चा निघणार आहे. तसेच, राज्यातील सर्व समन्वयक या मोर्चात सामील होणार आहेत. दोन दिवसात मराठा समाजाच्या प्रश्नांवर शासनाने तोडगा काढला नाही तर, राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारादेखील आबासाहेब पाटील यांनी यावेळी दिला.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आंदोलन काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, 2014 तील विद्यार्थ्यांच्या तत्काळ नियुक्त्या कराव्यात, 72 हजार मेगा भरती आणि MPSC तील विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात, शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ पीकविमा जमा करावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरून नरेंद्र पाटील यांना निलंबित करावे किंवा महामंडळ बरखास्त करावे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

Intro:मंत्रालयावर धडकणार मराठा क्रांती ठोक मोर्चा.. मागण्या मान्य न झाल्याने सरकारवर हल्ला बोलBody:

आपल्या प्रलंबित मागण्यांच्या बाबतीत सरकार गंभीर नसून त्यावर तोडगा काढत नसल्याने सोमवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शिलेदार थेट मंत्रालयावर धडकणार आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून निघालेल्या या मोर्च्यात हजारो लोक सामील होणार असून दोन दिवसात तोडगा काढला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिला.
आंदोलन काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, 2014 च्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात, 72 हजार मेगा भरती व MPSC तील विद्यार्थ्यांना नियुक्त्या दयाव्यात पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, नरेंद्र पाटील यांना तात्काळ निलंबित करा किंवा महामंडळ बरखास्त करा अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा हे आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चेचे समन्वयक आबासाहेब पाटील पत्रकार परिषदेत यांनी दिली. यावेळी सकाळ मराठा मोर्चेचे समन्वयक हे देखील उपस्थित होते .
Byte आबासाहेब भोसले(मराठा आंदोलन नेता)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.