ETV Bharat / state

ठाणे ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग - ठाणे ग्रामपंचायत निवडणूक न्यूज

१५ जानेवारीला राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यासाठी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज मागे घेण्यासाठी अनेक ठिकाणी लगबग दिसून आली.

people
नागरिक
author img

By

Published : Jan 5, 2021, 8:38 AM IST

ठाणे - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गावात एकोपा राहावा, या भावनेतून गावकऱ्यांनी काही ग्रामपंचायती बिनविरोध केल्या आहेत. जिल्ह्यातील इतरही ग्रामपंचायतींमध्येही अशा प्रकारे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे काल(सोमवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 तालुक्यातील निवडणूक कार्यलयांमध्ये राजकीय कार्यकत्यांची लगबग दिसून आली.

अंबरनाथमध्ये २७ ग्रामपंचायतींसाठी ७३७ उमेदवार -

अंबरनाथ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २४७ जागांसाठी ७४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत सहा अर्ज अवैध ठरल्याने ७३७ अर्ज वैध झाले आहेत. १५ जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासाठी सध्या ग्रामीण भागात बैठकांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे.

मुरबाडमध्ये उमेदवारी माघारीकडे लागले लक्ष -

मुरबाड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यासाठी काल(सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूण ७४८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मुरबाड तालुक्यात ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले आहे. सात सदस्यसंख्या असणाऱ्या ३० ग्रामपंचायत, ९ सदस्य असणाऱ्या १३ ग्रामपंचायत व ११ सदस्य असणारी राष्ट्रीय महामार्गावरील सरळगाव ग्रामपंचायत असे ३३८ सदस्य निवडून देण्यासाठी १५ जानेवारी रोजी निवडणुका होत असून त्यासाठी ४७ हजार २९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

भिवंडीमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध -

भिवंडीतील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने तब्बल १०७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तालुक्यातील वळ, निवळी व आलिंगर या तीन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तालुक्यात आता ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून या ५३ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतींमधील १९ सदस्यांच्या बिनविरोध निवड झाली आहे. वळ, निवळी, अलिमघर या ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर केवणी ग्रामपंचायतमधील १ सदस्य, सुरई सारंग ग्रामपंचायत १ सदस्य, मानकोली २, वारेट २, वडपे १, भादाणे २, सरवली २ , गुंदवली १ , पुंडास १ , राहुर १ , चिंचवली खांडपे १ , दापोडे ३ अशा बारा ग्रामपंचायतींचे १९ सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली. काल सायंकाळी उशिरापर्यंत १० ग्रामपंचायतींच्या माहिती घेणे बाकी असून त्यासंदर्भातील काम सुरू असल्याची माहिती देखील तहसीलदार पाटील यांनी दिली होती.

कल्याणमध्ये २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका -

कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीतील ७४ प्रभागांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस होता. बुधवारी शेवटच्या दिवशी तब्बल ३८८ अर्ज दाखल झाले असून एकूण ७२८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी ३१ तारखेला या अर्जाची छाननी झाली तर १ तारखेला ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी होता. दरम्यान ७४ प्रभागांच्या २११ जागांकरीता तब्बल ७२८ अर्ज दाखल झाल्याने आता तालुक्यात ख-या अर्थाने निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. मात्र, उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आकडेवारी काल रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती.

शहापूरमध्ये बारा ग्रामपंचायतींचे १९ सदस्य बिनविरोध -

शहापूर तालुक्यातील शहापूर तालुक्यातील डोळखांब, चेरपोली, अल्याणी, भावसे आणि दहिवली या पाच ग्रामपंचायतीच्या १७ वॉर्डातील ५१ जागांसाठी १३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या पाचही ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असून निवडणुकीमधील भगव्या वातावरणामुळे या ग्रामपंचायतीवर पुन्हा भगवा फडकणार असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. स्थानिक स्तरावर होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी विविध पक्षीय पदाधिकारी प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसली असली तरी शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या या पाचही ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा वरचष्मा रहाणार असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील चेरपोली अल्याणी या ग्रामपंचायतीमधील काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शहापूर तालुका दुर्गम भाग असल्याचे आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आकडेवारी रात्री उशिरा मिळणार असल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.