ETV Bharat / state

ठाण्यात मांडूळ सापाची तस्करी, एकाला अटक - ठाणे

मांडूळ या दोन तोंडांच्या सापाची तस्करी करणाऱ्या इस्तियाक उर्फ जावेद अहमद शेख (३८) याला मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेने सापळा रचून अटक केली.

ठाण्यात मांडूळ सापाची तस्करी, एकाला अटक
author img

By

Published : May 15, 2019, 10:17 AM IST

ठाणे - आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित मांडूळ या दोन तोंडांच्या सापाची तस्करी करणाऱ्या इस्तियाक उर्फ जावेद अहमद शेख (३८) याला मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे ४० लाख रुपये किमतीचा दुर्मिळ मांडूळ आढळला. आरोपीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यात मांडूळ सापाची तस्करी, एकाला अटक

आरोपी इस्तियाक उर्फ जावेद अहमद शेख (साठे नगर, संतोषीमाता चाळ, वागळे इस्टेट ठाणे) हा रिक्षा चालक आहे. शेख हा दुर्मिळ जिवंत साप घेऊन मंगळवारी विक्रीसाठी खारेगाव टोलनाका रेतीबंदर येथील रोडवर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचला. त्यावेळी ३ जण संशयित म्हणून आढळून आले. त्यातील इस्तियाक उर्फ जावेद अहमद शेख याच्याकडील पिशवीत मांडूळ आढळले.

गुन्हे पथकाने हे मांडूळ हस्तगत केले असून त्याची किंमत ४० लाख रुपये आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ३९(३) सह कलम ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:
४० लाखाच्या किमतीच्या महांडूळासह एक तस्कर गजाआड Body:

काली जादू, औषधीसाठी उपयोगात येणारे दुर्मिळ मांडूळासह आरोपी इस्तियाक उर्फ जावेद अहमद शेख(३८) याला सापळा रचून मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेने अटक केली. त्याच्याकडे ४० लाख रुपये किमतीचा दुर्मिळ महांडूळ आढळला. त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी इस्तियाक उर्फ जावेद अहमद शेख हा रिक्षा चालक असून तो साठे नगर, संतोषीमाता चाळ, वागळे इस्टेट ठाणे येथे राहणारा आहे. शेख हा दुर्मिळ जिवंत महाडूळ घेऊन मंगळवारी विक्रीसाठी खारेगाव टोलनाका रेतीबंदर येथील रोडवर येणार असलायची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचला तेव्हा तीनजण संशयित आले. त्यातील इस्तियाक उर्फ जावेद अहमद शेख याच्याकडे पिशवीत प्रजातीचे दुर्मिळ महाडूळ पथकाने हस्तगत केले. त्याची किंमत ४० लाख रुपये असून या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलाम ३९(३) सह कलाम ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.