ठाणे - ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरून प्रवास करताना गुरुकुल सोसायटीजवळ चारचाकी वाहनानs दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करण्याच्या नादात दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 26 जून) संध्याकाळी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी चार चाकी वाहनाचे चालक जिग्नेश शाह याला अटक केली आहे. अशपाक सलीम मोहम्मद अन्सारी (वय 47 वर्षे, रा. मनाबाई चाळ, गाव देवी, जेपी रोड, अंधेरी), असे अपघातात मरण पावलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी अशपाकचा मृतदेह उत्तरिीय तपसासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
दुचाकीस्वार हा ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने दुचाकीने प्रवास करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याऱ्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण खाली पडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, अग्निशमन दल आदींनी मदत कार्य केले. दरम्यान या घटनेची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. या अपघात प्रकरणी घटनास्थळी वरील नौपाडा पोलीस पथकाने चारचाकी वाहनाचे चालक जिग्नेश शाह याला अटक केली आहे.
हेही वाचा - कोविड इन्होवेशन पुरस्काराचे कल्याण-डोंबिवली व वाराणसी संयुक्त मानकरी..