ETV Bharat / state

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने मासळी विक्रेत्याची स्मशानभूमीत गळफास घेवून आत्महत्या

काकडवाल गावातील मासळी विक्रेता गेल्या २ दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे औषधोपचार घेऊन तो स्वतःच होम क्वारन्टाइन झाला. तर त्याने कोरोनाची चाचणी देखील केली होती. मात्र त्याचा रिपोर्ट येण्याआधीच त्याने गावातील स्मशानभूमीत गळफास घेवून आत्महत्या केली.

corona
याच स्मशानभूमीत मासळी विक्रेत्याने आत्महत्या केली
author img

By

Published : Jul 6, 2020, 10:55 PM IST

Updated : Jul 7, 2020, 12:30 PM IST

ठाणे - कोरोनाच्या भीतीमुळे मासळी विक्रेत्याने गावातील स्मशानभूमीतच गळफास घेवून आत्महत्या केल्याने उडाली आहे. ही घटना मलंगगड नजीक असलेल्या काकडवाल गावात घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने मासळी विक्रेत्याची स्मशानभूमीत गळफास घेवून आत्महत्या

कोरोना व्हायरसची दहशत संपूर्ण जगात पसरली आहे. संशयित कोरोनाबाधित रुग्णांच्या मनात कोरोना विषाणूमुळे भीती निर्माण होऊन अनेक रुग्णांनी घाबरुन टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. त्यातच ग्रामीण परिसरातही कोरोनाने शिरकाव केला. मात्र काही ग्रामीणसह शहरी नागरिकांमध्ये गैरसमज अधिकच वाढले आहेत. अशीच एक घटना कल्याण जवळील मलंगगड येथील काकडवाल गावातील एक मासळी विक्रेत्यासोबत घडली. हा विक्रेता गेल्या २ दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे औषधोपचार घेऊन तो स्वतःच होम क्वारन्टाइन झाला. तर त्याने कोरोनाची चाचणी देखील केली होती. मात्र त्याचा रिपोर्ट येण्याआधीच त्याने गावातील स्मशानभूमीत गळफास घेवून आत्महत्या केली.

कोरोना विषाणूमुळे तो घाबरुन गेला होता. त्यातूनच त्याने २ दिवसापूर्वी रात्रीच्या अंधारात आपली जीवनयात्रा संपवल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर स्मशानभूमीत व परिसर निर्जंतुकरण करण्यात आले. दुसरीकडे मुंबईनंतर आता लगतच्या शहरांमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. दरम्यान, कोरोना आजरामधून लोक बरे होत आहेत. कल्याणमधील ६ महिन्याचे बाळ असो किंवा १०४ वर्षाचे आजोबाही कोरोना आजरामधून बरे झाले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही नागरिकांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये, असे आवाहन गावातील सरपंच चैनू जाधव यांनी केलं आहे.

Last Updated : Jul 7, 2020, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.