ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयातून रॉकेल टाकून पत्नीला पेटवले; पती अटकेत

उल्हासनगरमध्ये पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली. चारित्र्यावर संशयावरुन आरोपीने हे कृत्य केले. या प्रकरणी मनोजकुमार दुर्गाप्रसाद यादव (वय-३५) याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे.

victim
पीडित पत्नी
author img

By

Published : Feb 14, 2020, 9:26 PM IST

ठाणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली. उल्हासनगरमधील गोबाईपाडा परिसरात ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनोजकुमार दुर्गाप्रसाद यादव (वय-३५) याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे.

चारित्र्याच्या संशयातून रॉकेल टाकून पत्नीला पेटवले

आरोपी मनोजकुमार यादव हा उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ येथील शांतीनगर परिसरात पत्नीसोबत राहतो. मनोजकुमार हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याने पत्नीजवळील मोबाईल फोन हिसकावून घेत भांडण केले. त्या भांडणात मनोजकुमार याने घरातील स्टोव्हमधील रॉकेल पत्नीच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यात ती ४५ टक्के भाजल्याने तिला उपचारासाठी प्रथम उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णाालय आणि तेथून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - दुसरं 'हिंगणघाट' टळलं : पालघरमध्ये लग्न मोडल्याच्या रागातून मुलीच्या आई-बहिणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

दरम्यान, पीडितेने दिलेल्या जबाबावरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मनोजकुमार यादवविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. डी. राळेभात हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.