ETV Bharat / state

Maharashtra Bhushan Award 2022: अमित शाह यांच्याकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार प्रदान

author img

By

Published : Apr 16, 2023, 10:02 AM IST

Updated : Apr 16, 2023, 12:57 PM IST

महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक सदस्य रात्रीच दाखल झाले होते. केंद्रीय मंत्री अमित शाह आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान केला आहे. आज या पुरस्कार सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.

Maharashtra Bhushan Award 2022
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या तयारी पूर्ण झाली होती. आज हा पुरस्कार साडेदहाच्या दरम्यान पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रात्रीच मुंबईत आले आहेत. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला गेला. त्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला आहे.

सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनुयायी दाखल : लाखोंच्या संख्येच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने आज गौरविले गेले आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा आज पार पडला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा सोहळा संपन्न झाला. सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो अनुयायी खारघरमध्ये दाखल झाले. रात्रीपासून सदस्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून येण्यास सुरुवात झाली होती.

दासबोधाच्या माध्यमातून समाजात बदल : महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित आहेत. स्वर्गीय महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील आहेत. त्यांनी दासबोधाच्या निरूपणातून समाजात सकारात्मक आमूलाग्र बदल केले आहेत.

समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम : दासबोधी विचारांच्या माध्यमातून जनजागृती करत समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम या चळवळीतून झाले आहे. आपले वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचा समाज परिवर्तनाचा हा वसा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे जेष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. आज तो देण्यात येत आहे. खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी आठवड्याभरापासून सदस्यांकडून श्रमदान केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली होती.

हेही वाचा : Maharashtra Bhushan Award : समाजोद्धारक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Last Updated : Apr 16, 2023, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.