ठाणे : लव्ह जिहाद वरून देशभरात वातावरण तापलं असताना भिवंडीत लव्ह जिहादचं प्रकरण समोर आलं आहे. पतीपासून अलिप्त राहात असलेल्या एका 27 वर्षीय महिलेशी खोटं बोलून लव्ह जिहाद केल्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीनं महिलेशी मैत्री केली होती. मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. त्यानंतर आरोपीनं पीडितेवर वारंवार बलात्कार केला.
आरोपी फरार : या प्रकरणी पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरुन भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीत प्रेमाच्या जाळ्यात फसवून धर्म परिवर्तन केल्याचंही म्हटलं आहे. तसंच तिहेरी तलाक दिल्याचं पीडितेन दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपीवर (रा.गैबी नगर भिवंडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. (Love Jihad in Bhiwandi)
लॉजवर नेत शरीरसंबंध : आरोपीनं सोशल मीडियावर पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका २७ वर्षीय महिलेशी मैत्री केली होती. पीडित महिलेची 7 वर्षीय मुलगी नेहमी आजारी पडत असल्यानं आरोपीनं महिलेच्या मुलीला दर्ग्यात नेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पीडित महिलेला मुलीसोबत शहरातील एका दर्ग्यात घेऊन गेली होती. त्यानंतर पीडित महिलेशी आरोपीनं आपलं नाव राजू सांगून प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर त्यानं पीडितेला एका लॉजवर नेत शरीरसंबंध केले.
पीडितेनं केला निकाह : माझा स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय असल्यानं मी तुझ्याशी लग्न करुन मुलीची काळजी घेईन असे सांगून दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. त्यानंतर आरोपीनं 26 जानेवारी 2020 रोजी धामणकर नाका परिसरातील एका इमारतीतील एका फ्लॅटमध्ये महिलेशी लग्न केलं होतं. मात्र, एका वर्षानंतर आरोपीनं पीडित माहिलेला आपलं नाव वेगळंच असल्याचं सांगितलं. त्यामुळं यापुढे माझ्या सोबत राहायचं असल्यास मुस्लिम पद्धतीने निकाह करण्यास सांगितलं. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीचा यापूर्वी निकाह झाला आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून चार मुलं असल्याचं पीडित महिलेला समजलं होतं.
आरोपीचा शोध सुरू : तरी देखील पीडित माहिलेनं आरोपीसोबत पुन्हा मुस्लिम पद्धतीने 31 मे 2022 रोजी निकाह केला होता. मात्र, वडिलोपार्जित संपत्तीतून नातेवाईक आपल्याला बेदखल करतील, त्यामुळे तू मला तलाक दे असं आरोपी राजूने पीडित महिलेला सांगितलं. मात्र त्यास पीडित महिलेनं नकार दिल्यानं आरोपीनं शिवीगाळ पीडितेला मारहाण केली. त्यांनतर 4 मे 2023 रोजी एका कागदावर तीन वेळा तलाक दिला होता. त्यामुळं आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांचं पथक गेल्या चार दिवसांपासून आरोपींचा शोध घेत असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा -