ETV Bharat / state

Thane Crime : Whats App गृपवरील चर्चेनंतर राष्ट्रवादी आणि रिपाई कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा - राष्ट्रवादीचे नेते ओमी कलानी

( Thane Crime )"इंडियन राजनीती" व्हाट्सअप ग्रृपवरील चर्चेनंतर ( After a discussion on the WhatsApp group ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि (रिपाई) आठवले गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या जोरदार राड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर राड्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले असून, उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

Thane Crime
राष्ट्रवादी आणि रिपाई कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
author img

By

Published : Nov 27, 2022, 4:42 PM IST

ठाणे : "इंडियन राजनीती" व्हाट्सअप ग्रृपवरील चर्चेनंतर ( After discussion on the WhatsApp group ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि (रिपाई) आठवले गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या जोरदार राड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर राड्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले असून, उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

व्हाट्सअप गृपवर वादग्रस्त चर्चा - मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते ओमी कलानी यांचे उल्हासनगर कॅम्प-2 परिसरात (बंगला) निवासस्थान आहे. ओमी कलानी यांचे खास कार्यकर्ते कमलेश निकम आणि रिपाई आठवले गटाचे आकाश सोनवणे यांची "इंडियन राजनीती" व्हाट्सअप ग्रृपवरील एकमेकांविरोधात काल रात्रीच्या सुमारास वादग्रस्त चर्चा सुरू झाली. दरम्यान, उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कमलेश निकम आणि आठवले गटाचे माजी उपमहापौर भगवान भालेराव यांचे परस्पर विरोधी गट आहे. अनेक दिवसांपासून भालेराव आणि निकम समर्थक एकमेकांमध्ये विकास कामावरून सोशल मीडियावर कमेन्ट पास करत आहेत.

राष्ट्रवादी आणि रिपाई कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद - काल रात्रीही निकम यांनी भालेराव यांच्या विरोधात उल्हासनगरच्या इंडियन राजनीती ह्या व्हाट्सएप ग्रुपवर कुटूंबाविषयी कमेंट पास केली. त्याचा राग मनात धरून आकाश सोनवणे आणि त्याचे दोन साथीदार हे कलानी बंगल्यावर येताच क्षणी कमलेश निकम यांना मारहाण करायला सुरुवात केली. परंतु त्याठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी हा प्रकार पाहताच आकाश सोनवणे आणि त्याच्या दोन साथीदार यांना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ह्या तिघांवर सद्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल - दरम्यान, माजी आमदार पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांनी रिव्हॉल्व्हर कानावर ठेवून धमकी दिल्याचा आरोप आठवले गटाचे आकाश सोनावणे यांनी केला आहे. तर भगवान भालेराव यांनी माझ्या हत्याचा कट रचला असून आकाश सोनावणे आणि त्याचे साथीदार हे त्याचं उद्देशाने कलानी बंगल्यात आल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या कमलेश निकम यांनी केला आहे. या घटनेनंतर काही रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर जमाव जमून घोषणाबाजी केली होती. त्यामुळे उल्हासनगर शहरात राजकीय वातावरण चिघळल असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. उल्हासनगर पोलिसांनी दोन्ही गटावर परस्परविरोधी गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.