ETV Bharat / state

Look back 2022 : ज्वालामुखीच्या तालुक्यात वर्षभरात २०० हून अधिक आगीच्या घटना

Look back 2022 यंदाच्या वर्षभरात सुमारे २०० हुन अधिक आगीच्या घटना ( More than 200 fire incidents ) घडल्याचे समोर आले आहे. भिवंडी शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने यंत्रमाग कारखान्यासह कापड साठवलेल्या गोदामांना तसेच डाईंग साइजिंगला ( Dyeing Sizing ) आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. ( fire incidents in year in Bhiwandi ) मोठ्या प्रमाणात केमिकल गोदामांसह भंगार व इतर साहित्याच्या गोदामांना आगी लागण्याच्या घटना नियमित घडत असतात. या आगीत वर्षभरात कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ( More than two hundred fire incidents in year )

Look back 2022
ज्वालामुखीच्या तालुक्यात वर्षभरात २०० हुन अधिक आगीच्या घटना
author img

By

Published : Dec 26, 2022, 8:17 AM IST

ठाणे : Look back 2022 भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील गोदाम ( rural warehouse ) पट्ट्यात लहान मोठ्या भीषण आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ज्वालामुखीचा तालुका ( Taluka of Volcanoes ) अशी ओळख भिवंडी तालुक्याची निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षभरात सुमारे २०० हुन अधिक आगीच्या घटना ( More than 200 fire incidents ) घडल्याचे समोर आले आहे. त्यापैकी सर्वात जास्त आग मार्च महिन्यात लागल्याचे भिवंडी ( fire incidents in year in Bhiwandi ) अग्निशमन दलाच्या कार्यलयातील नोंदीवरून ( Fire Brigade Office ) उघडकीस आले आहे. ( Look back 2022 )

लाखोंच्या संख्येने ग्रामीण भागात गोदामे : भिवंडी शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने यंत्रमाग कारखान्यासह कापड साठवलेल्या गोदामांना तसेच डाईंग साइजिंगला आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. तर शहरालगतच्या ग्रामीण भागात गोदामे लाखोंच्या संख्येने असून या मधील काही गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल गोदामांसह भंगार व इतर साहित्याच्या गोदामांना आगी लागण्याच्या घटना नियमित घडत असतात. या आगीत वर्षभरात कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असते.

भंगाराची गोदामे सर्वाधिक खाक : भिवंडीत लागणाऱ्या आगीनच्या घटनांमध्ये सर्वाधिक भंगाराची गोदामे जळत असून केमिकल व यंत्रमाग कारखान्यांना आगी लागल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात. यापूर्वीही तत्कालीन मंत्री रामदास कदम यांनी भिवंडीतील गोदाम पट्यातील अनेक ठिकाणच्या गोदामात बेकादेशीर घातक रसायनांचा साठा आढळून आल्याने त्यांनी त्यावेळी २० ते २५ घातक रसायनांचा साठा करणारे गोदामे सील करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. तरी देखील आजही काही ठिकाणी छुप्या रित्या घातक रसायनांचा साठा साठवून केली जात असल्याची माहिती अनेक वेळा पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत उघड झाली आहे.

विद्युत उपकरणांची देखभाल करणे गरजेचे : बहुतांश कारखाने व गोदामात अनेक वेळा कामगारांच्या कामचुकारपणामुळे कारखान्यातील उपकरणे बंद न केल्यामुळे तसेच विजेची उपकरणे व वायर यांची योग्य ती देखभाल व दखल न घेतल्यामुळे शॉर्ट शॉर्टसर्किटने आगी लागण्याचे प्रमाण शहरी भागासह गोदाम पट्यातही मोठ्या प्रमाणात आहे.

आगीच्या मागे संशयाचा धूर : विमा काढण्याबाबत उदासीनता, भिवंडीत यंत्रमाग कारखाने मोठ्या प्रमाणात असूनही अनेक वेळा कारखाने मध्ये विमा काढण्याबाबत उदासीनता दिसत असते, तर गोदामांमध्ये मार्च महिन्यात आगींच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने विमा बाबत नेहमीच संशय निर्माण केला जात आहे.

सर्वाधिक आगी शॉर्ट सर्किटमुळे : भिवंडीतील यंत्रमाग कारखाने तसेच गोदामांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून विजेची उपकरणे बंद करण्याकडे कामगारांचे दुर्लक्ष असते तसेच विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरिंगची देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी होत नसल्याने शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्यामुळे नागरिकांसह कामगारांनी गोदाम, घर अथवा कारखान्यातून बाहेर पडतांना विजची उपकरणे बंद करूनच बाहेर पडणे गरजेचे असल्याचे मत भिवंडी महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख राजेश पवार यांनी व्यक्त केले आहे.

वर्ष भरात आगीच्या २०० हुन अधिक घटना : वर्ष भरात आगीच्या २०० हुन अधिक घटना भिवंडी शहर व ग्रामीण भागात आगीच्या घटना वारंवार घडत असून जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या काळात १९५ आगींच्या घटनांची नोंद भिवंडी मनपा अग्निशमन दलाकडे करण्यात आली आहे. तर डिसेंबर महिन्यात कालच एका टिश्यू पेपरच्या गोदामाला भीषण आग लागली होती. तसेच गेल्या १० दिवसापूर्वी ग्रामीण भागातील कापूर, अगरबत्तीच्या गोदामासह कंपनी जळून खाक झाली आहे. त्यापैकी सर्वात जास्त आग मार्च महिन्यात लागल्याचे भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यलयातील नोंदीवरून उघडकीस आले आहे.

कोणत्या महिन्यात किती आगीच्या घटना ?

महिना घटना
जानेवारी २५
फेब्रुवारी २६
मार्च37
एप्रिल18
मे 15
जून8
जुलै 6
ऑगस्ट12
सप्टेंबर 8
ऑक्टोबर 17
नोव्हेंबर 23
डिसेंबर10
एकूण २००+

कोटींचे साहित्य खाक : आगींच्या घटनांमध्ये कोट्यावधी रुपयांचे साहित्यसह साठवून ठेवलेला माल जळून खाक होत असते. मात्र नेमकी किती रुपयांचे नुकसान झाल्यात आहे याचा निश्चित आकडा अग्निशमन दलाकडे नसतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.