ETV Bharat / state

ठाण्याच्या ग्रामीण क्षेत्रातील कंटेनमेंट झोन मध्येही 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन - ठाणे लॉकडाऊन न्यूज

ठाणे जिल्ह्यात 1 जुलै पासून लागू करण्यात आलेले लॉकडाऊन ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोनमध्ये 31 जुलैपर्यंत लागू राहणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नार्वेकर यांनी दिला आहे.

Thane Corona news
ठाणे कोरोना न्यूज
author img

By

Published : Jul 20, 2020, 12:37 PM IST

ठाणे-जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन अस्तित्वात असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे. या भागात 1 जुलै रोजी लागू केलेले प्रतिबंध 31जुलैपर्यत लागू असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

कंटेनमेंट झोन मध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव व रुग्णसंख्या वाढत असल्याने पूर्वीचे प्रतिबंध अस्तित्वात असलेल्या कंटेनमेंट झोनपुरते पूर्ववत लागू ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तसेच अंबरनाथ व कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात मुख्याधिकारी यांनी कोरोनाग्रस्त व्यक्तींची संख्या विचारात घेऊन कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहेत. त्या क्षेत्रामध्ये आता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.

पुढील काळात ज्या क्षेत्रात नव्याने कंटेनमेंट झोन अस्तित्वात येतील तेथे देखील हे प्रतिबंधात्मक आदेश 31 जुलैपर्यंत लागू राहतील. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन आदेशानुसार सवलती लागू राहतील. त्यानुसार मॉल्स व त्यासारखी मार्केट कॉम्प्लेक्सेस् वगळता सर्व प्रकारची दुकाने P1-P2 तत्वावर सम/विषम तारखांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. संबंधित नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामपंचायत यांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

लॉकडाऊन संदर्भात करण्यात आलेल्या जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास संबंधित व्यक्ती विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम व भारतीय दंड संहिता नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.