ठाणे: वाढता उन्हाचा पारा आणि त्यातून बचाव करता यावा किंवा आपल्याला गारवा मिळाला म्हणून उन्हाळ्यात लिंबू शरबत किंवा इतर थंड पेयांना मोठी मागणी असते. यासाठी प्रामुख्याने लिंबाचा वापर केला जातो; मात्र एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे लिंबाच्या किमतीने बाजार गरम केले आहे. काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना मिळणारे तीन लिंबू आता १० रुपयांमध्ये एक मिळू लागले आहे.
अवकाळी पावसाने केली दरवाढ: अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे लिंबाचे उत्पादन कमी होत असल्याने लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने वाढीव दरात लिंबू विकत घ्यावे लागत आहेत. उन्हाळा आला की, शरीर थंड करण्यासाठी लिंबू महत्त्वाचा असतो आणि याच ऋतूत लिंबाची मागणी प्रचंड वाढते. यामुळेच लिंबाचे उत्पादन आणि मागणी याच्यात मोठ्या प्रमाणात तफावत जाणवते. त्यात आता अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून थेट लिंबू खरेदी करत असून त्याचासुद्धा परिणाम निंबाच्या दरांवर झालेला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता सर्वसामान्य ग्राहकांसाठी बाजारात लिंबू मिळणे दुर्मिळ झाले आहे.
हॉटेल इंडस्ट्रीवर मोठा परिणाम: उन्हाळ्यात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. निंबूपाणी विक्रेत्यांकडूनही याची ठोक दराने खरेदी केली जाते. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आवश्यक असलेले लिंबू घातल्यामुळे महाग होते आणि त्याच्यामुळे अनेक हॉटेल्समधून ग्राहकांना मोफत दिले जाणारे लिंबू देखील आता गायब झालेले पाहायला मिळत आहे.
कोरोनानंतर लिंबाला मागणी वाढली: लिंबामध्ये असलेल्या जीवनसत्त्वांमुळे कोरोनांतर लिंबू आहारामध्ये दिसू लागले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्यामुळे लिंबाची मागणी तेव्हापासून वाढली आणि यामुळेच लिंबाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आयुर्वेदामध्ये देखील लिंबाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये लिंबाचा रस वापरला जातो. एवढेच नव्हे तर लिंबामुळे त्वचेवर देखील परिणामकारक फरक होत असल्याने लिंबाला जास्त मागणी आहे.
कोल्ड्रिंकपेक्षा लिंबू महाग: जिथे कोल्ड ड्रिंकचा छोटा पॅक किंवा बाटली किंवा ग्लास 15 ते 20 रुपयांना मिळतो, अशी परिस्थिती आहे. तिथे छिंदवाडामध्ये 1 लिंबू त्यापेक्षाही महाग होत आहे. लिंबाच्या दरात अचानक झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांचा खिसाही मोकळा होत आहे. नवरात्रीसोबतच रमजानचा सण आणि त्यानंतर अचानक वाढणाऱ्या उन्हामुळे लिंबाच्या मागणीतही वाढ झाल्याचे घाऊक भाजी बाजारातील व्यापाऱ्यांचे मत आहे. या कारणास्तव लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. दुसरे कारण म्हणजे छिंदवाडा येथील लिंबू शेजारच्या महाराष्ट्रातून येतो. त्यामुळे लिंबू आता महाग झाले आहे.
उन्हाळ्यात लिंबू खूप फायदेशीर: उन्हाळ्यात लिंबू सेवन करणे खूप फायदेशीर आहे. लिंबाच्या वापराने तुम्ही तुमचे सौंदर्य तर वाढवू शकताच पण ते तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी देखील ठेवते. लिंबू पाण्याने उन्हाळ्यात आराम मिळतो. शरीरातील उष्णता आणि आर्द्रतेमुळे कमी होणारे क्षाराचे प्रमाणही लिंबू नियंत्रित करतो. तसेच पचनक्रिया सुरळीत राहते. लिंबूपाण्यात व्हिटॅमिन-सी आणि पोटॅशियमचे गुणधर्म भरपूर असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. याशिवाय लिंबूमध्ये इतरही अनेक औषधी गुणधर्म आहेत.
हेही वाचा: Mango Rates Expensive: आंब्याचे भाव गगनाला, ग्राहकांना किंमत कमी होण्याची प्रतीक्षा