ETV Bharat / state

मुंब्य्रात पेपरवाला चाळीत कोसळली दरड; 1 जखमी - पेपरवाला चाळ

या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.वित्ती हानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंब्य्रात पेपरवाला चाळीत कोसळली दरड
author img

By

Published : Aug 3, 2019, 10:05 PM IST

ठाणे - शुक्रवारी दुपारपासून सात्यत्याने मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंब्रा हनुमान नगर- 1, ठाकूरपाडा, पेपरवाला चाळ येथे दरड कोसळली. यामध्ये एक 16 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. तर बसेरा इमारतीच्या 4 माळ्याचा भाग तिसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये कोसळला. मात्र, या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालिकेने या ठिकाणी 23 सदनिका आणि 6 दुकाने सील केली आहेत.

मुंब्य्रात पेपरवाला चाळीत कोसळली दरड
मुंब्य्रात पेपरवाला चाळीत कोसळली दरड

मुंब्रा ठाकूरपाडा पेपरवाला चाळ येथे हनुमान नगर- 1 डोंगरपायथ्याशी बांधण्यात आलेल्या घरांवर दरड कोसळली. त्यामुळे 3 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये 16 वर्षीय अविनाश हा घरात झोपला होता. त्यामुळे तो जखमी झाला. यामध्ये अविनाशच्या पायाला आणि खांद्याला जबर दुखापत झाली आहे. तर, या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. वित्तीहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंब्रा परिसरातील रशीद कंपाऊंडमधील बसेरा इमारतीच्या बी विंगमध्ये शनिवारी सकाळी अचानक चौथ्या माळ्यावरच्या बेडरूमचा भाग हा तिसऱ्या माळ्यावर पडला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने यावेळी घरातील सर्वजण बाहेर होते. बसेरा इमारत 4 माळ्याची आहे. या इमारतीत 23 सदनिका आणि 6 दुकाने होती.

शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दिवा प्रभाग समितीचे उप-अभियंता सचिन कदम, आणि अतिक्रमण विभागाचे साबळे, यांच्यासह मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गडे यांनी भेट दिली. यावेळी इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारत आणि दुकाने खाली करून पालिकेने सील करण्याची कारवाई केली.

Intro:
मुंब्रा ठाकूरपाडा येथे माळीणची पुनरावृत्ती ...... दरडीने ३ घराचे नुकसान
रशीद कंपाउंड बसेरा इमारतीचा चौथ्या माळ्याचा बेडरूम
तिसऱ्या माळ्यावर आला-२३ रूम -६ दुकाने सीलBody:

शुक्रवारी दुपारपासून सात्यत्याने मुसळधार पाऊसाने शनिवारी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले. पाणी साचण्याची सोबत अपघाताची संख्याही वाढली. मुसळधार पावसाच्या आणि जोरदार वाऱ्याने मुंब्रा हनुमान नगर-१, ठाकूरपाडा, पेपरवाला चाळ येथे दरड कोसळल्याने माळीण सारखी दुर्घटनेची पुनरावृत्ती होताहोता वाचली. दरड कोसळल्याने एक १६वर्षीय मुलगा जखमी झाला. अंतर दुसऱ्या घटनेत इमारतीच्या चौथ्या माळ्याचा बेडरूम हा तिसऱ्या माळ्याच्या बेडरूम मध्ये पडला सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पालिकेने २३ सदनिका आणि ६ दुकाने सील करण्याची कारवाई केली.
मुंब्रा ठाकूरपाडा पेपरवाला चाळ , हनुमान नगर येथे माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होताहोता वाचली. डोंगरपायथ्याशी बांधण्यात आलेल्या घरांवर दरड कोसळली. यामुळे तीन घराचे नुकसान झाले. मोठे दगड घरात घुसले. या अपघातात १६ वर्षीय अविनाश हा घरात झोपला असताना हि दरड कोसळण्याची घटना घडली. यात अविनाश याच्या पायाला आणि खांद्याला जबर दुखापत झाली. कुठलीही जीवितहानी नाही वित्तीय हानी झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकारी यांनी दिली.

रशीद कंपाऊंडमध्ये चौथ्या माळ्याचा बेडरूम आला तिसऱ्या माळ्यावर

मुंब्रा परिसरातील रशीद कंपाउंड मधील बसेरा इमारतीच्या बी विंगमध्ये शनिवारी सकाळी अचानक चौथ्या माळ्यावरच्या बेडरूम हा तिसऱ्या माळ्यावर पडल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही सुदैवाने घरातील मंडळी बाहेर होते. बसेरा इमारत बी विंग तळ + ४ माळ्याची इमारत आहे. या इमारतीत २३ सदनिका आणि ६ दुकाने होती. शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घट नेची माहिती मिळताच घटनास्थळी दिवा प्रभाग समितीचे उप अभियंता सचिन कदम, आणि अतिक्रमण विभागाचे साबळे, यांच्यासह मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गडे यांनी भेट दिली. यावेळी इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारत आणि दुकाने खाली करून पालिकेने सील करण्याची कारवाई केली. मुंबर रशीद कंपाउंड परिसरातील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.