ETV Bharat / state

उल्हासनगरात नशेबाजीचा व्यापार करणारी लेडी डॉन जेरबंद; 1 किलो ६० ग्राम गांजा जप्त

उल्हासनगर शहरात नशेबाजीचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अनेकदा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दिसून आले आहे. असाच नशेबाजीचा व्यापार करणाऱ्या एका लेडी डॉनला मध्यवर्ती पोलिसांनी गजाआड केले आहे. पल्लवी उर्फ संगिता (वय ४५) असे अटक झालेल्या लेडी डॉनचे नाव आहे.

Lady Don Pallavi arrested Ulhasnagar
उल्हासनगरात नशेबाजीचा व्यापार करणारी लेडी डॉन जेरबंद
author img

By

Published : Nov 30, 2020, 9:26 PM IST

ठाणे - उल्हासनगर शहरात नशेबाजीचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अनेकदा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दिसून आले आहे. असाच नशेबाजीचा व्यापार करणाऱ्या एका लेडी डॉनला मध्यवर्ती पोलिसांनी गजाआड केले आहे. पल्लवी उर्फ संगिता (वय ४५) असे अटक झालेल्या लेडी डॉनचे नाव आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर

पल्लवी उर्फ संगिता ही उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात नशेबाजीचा व्यापार करायची. दरम्यान, संगीता ही उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ३ येथील साईबाबा मंदिराजवळ गांजा विक्री करत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी काल दुपारच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. यात पोलिसांनी संगिताकडे १ किलो ६० ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय बेंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात संगिता हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे करीत आहे. नशेबाजीच्या व्यावसायात संगीता सोबत आणखी कोण सामील आहे? तसेच तिने गांजा कोठून आणला व ती कुणाला विक्री करत होती? याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली.

हेही वाचा - गोळीबार प्रकरणात तीन आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.