ETV Bharat / state

उल्हासनगरमधून 5 वर्षीय चिमुरडीचे अपहरण, आरोपी 12 तासात पोलिसांच्या ताब्यात

घराबाहेर खेळत असलेल्या एका 5 वर्षीय चिमुरडीचे उल्हानगरमधून अपहरण झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केवळ 12 तासात आरोपीला ताब्यात घेत चिमुरडीची सुटका केली.

author img

By

Published : Dec 2, 2019, 5:52 PM IST

Updated : Dec 2, 2019, 8:00 PM IST

police with kidnapper
आरोपीसह पोलिस पथक

ठाणे - घराबाहेर खेळत असलेल्या एका 5 वर्षीय चिमुरडीचे उल्हानगरमधून अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी सीसीव्हीटी फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्याला 12 तासातच खारघर परिसरातून ताब्यात घेत त्याच्या तावडीतून चिमुरडीची सुखरूप सुटका केली. नुरआलम नबीहुसन अन्सारी (वय 40 वर्षे), असे अपहरणकर्त्याचे नाव आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

उल्हासनगर शहरातील 5 वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर तिच्या वडिलांनी मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी 4 पोलीस पथक तयार केले. त्या पथकांनी अपहरण करण्यात आलेल्या ५ वर्षीय मुलीचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे, असलम खतीब, पोलीस उपनिरीक्षक यागेश गायकर, संतोष वझे, पोलीस हवालदार संजय बेंद्रे आदी पोलिसांनी उल्हासनगर परिसरात. तसेच मुलीचे अपहरण झालेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. याशिवाय काही नागरिकांकडे पोलिसांनी चौकशी केली असता 35 ते 40 वर्षीय एक व्यक्ती त्या मुलीला घेऊन जात असताना दिसल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून व नागरीकांकडून मिळालेल्या माहितीवरून त्या अपहरणकर्त्याचे वर्णन घेऊन त्याचे शोधकार्य सुरू केले. त्यावेळी पोलिसांना खबऱ्यांमार्फत तो अपहरणकर्ता मुलीला घेऊन नवी मुंबई खारघर येथे गेला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत अवघ्या 12 तासांच्या आतच आरोपी नुरआलम नबीहुसन अन्सारी याला खारघर येथे सापळा रचून ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून त्या 5 वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करून त्याला अटक करण्यात आली.

अपहरणकर्ता नुरआलम हा मुळ उत्तप्रदेशातील जंगलबेनवान येथील रहिवासी आहे. त्याने त्या मुलीचे अपहरण का केले होते? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केलेल्या त्या चिमुरडीला तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, तर आरोपी नुरआलम नबीहुसन अन्सारी याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालाने सुनावली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकर करीत आहेत.

हेही वाचा - गँगस्टर एजाज लकडावाला टोळी सक्रीय, व्यापाऱ्याला मागितली २ कोटींची खंडणी

Intro:kit 319Body:५ वर्षाच्या चिमुरडीचा अपहरणकर्ता सीसीव्हीटी फुटेजमुळे १२ तासात गजाआड

ठाणे : घराबाहेर खेळत असलेल्या एका ५ वर्षीय चिमुरडीचे उलहानगरच्या कॅम्प नं. ३ येथील दसेरा मैदान परिसरातील कोमलकुंज अपार्टमेंटमधून अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र मध्यवर्ती पोलिसांनी सीसीव्हीटी फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्याला १२ तासांतच खारघर परिसरातून गजाआड करीत त्याच्या तावडीतून चिमुरडीची सुखरूप सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे. नुरआलम नबीहुसन अन्सारी (४०) असे पोलिसांनी गजाआड केलेल्या अपहरणकर्त्याचे नाव आहे.

उल्हानसागर शहरातील कॅम्प नं. ३ येथील दसेरा मैदान परिसरातील इंदिरा गांधी मार्केट जवळ कोमलकुंज अपार्टमेंटमध्ये रमेश दलबहाद्दूर थापा (३२) हा वॉचमेन त्याच्या कुटूंबासह राहतो. त्याची ५ वर्षीय मुलगी शनिवारी सकळी १० च्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर रमेश थापा यांनी अज्ञात इसमाने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल केली. तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी ४ पोलिस पथक तयार करून अपहरण करण्यात आलेल्या ५ वर्षीय मुलीचा शोध कार्य सुरू केले. पो.नि.राजेंद्र कोते, स.पो.नि.ईश्वर कोकरे, असलम खतीब, पो.उप.नि.यागेश गायकर, संतोष वाझे, पो.हवा.संजय बेंद्रे आदी पोलिसांनी उल्हासनगर परिसरात व मुलीचे ज्याठिकाणाहून अपहरण झाले होते. त्याठिकाणाचे सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केली. याशिवाय काही नागरीकांकडे पोलिसांनी चौकशी केली असता ३५ ते ४० वर्षीय एक इसम त्या मुलीला घेऊन जात असताना दिसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी प्राप्त केलेल्या सिसिटीव्ही फुटेजवरून व नागरीकांकडून मिळालेल्या माहितीवरून त्या अपहरणकर्त्याचे वर्णन घेऊन त्याचे शोधकार्य सुरू केले. त्यावेळी पोलिसांनी काढलेल्या गुप्त बातमीदारामार्फत अपहरणकर्ता मुलीला घेऊन नवी मुंबई खारघर येथे गेला असल्याची माहिती मिळवत पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन अवघ्या १२ तासाच्या आताच आरोपी नुरआलम नबीहुसन अन्सारी याला खारघर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, तसेच त्याच्याकडून त्या ५ वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करून त्याला अटक करण्यात आली.

अपहरणकर्ता नुरआलम हा मुळ उत्तप्रदेशातील जंगलबेनवान येथला राहणारा आहे. त्याने त्या मुलीचे अपहरण का केले होत? याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केलेल्या त्या चिमुरडीला तिच्या आईवडीलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तर आरोपी नुरआलम नबीहुसन अन्सारी याला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकर करीत आहेत.

बाईट / सुधाकर सुराडकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
Conclusion:ulhasnagr
Last Updated : Dec 2, 2019, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.