ठाणे: पीडित पाच वर्षीय चिमुरडी (a small girl) भिवंडी भागात कुटूंबासह राहते. तर नराधमही त्याच परीसरात राहतो. १४ ऑक्टोंबर २०१८ रोजी दुपारी पीडित मुलगी भाऊ आणि बहिणी सोबत एका मंदिरात गेले होते. नराधम अनिलला पीडिता ओळखत होती. घटनेच्या दिवशी नारधमाने पीडितेला पाहताच शीतपेय देण्याचे अमिष दाखवत तिचे अपहरण केले तिला निर्जनस्थळी नेले. नंतर त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. घरी परतलेल्या पीडितेने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.
तिचा छळ झाल्याचे व्रण पीडितेच्या शरीरावर दिसले. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली त्यानुसार नरधामावर अत्याचार, अपहरण आणि पोक्सो कायद्यानुसार (As per POCSO Act) गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी नराधमाला तत्काळ अटक केली. त्यानंतर ठाणे पोक्सो न्यायलायाचे न्यायमूर्ती व्ही.व्ही.वीरकर यांच्या न्यायालयात खटला सुरु होता.
खटल्यात विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) रेखा हिवराळे यांनी पीडितेच्या बाजूने जोरदार युक्तीवाद केला. तसेच सदर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठाणे पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती व्ही.व्ही. वीरकर यांच्या न्यायालयात अंतिम सुनानाई झाली. रेखा हिवराळे यांनी सबळ पुरावे आणि ८ साक्षीदार तपासले. अखेर साक्षी पुरावे ग्राह्य धरीत न्यायमूर्ती वीरकर यांनी आरोपी अनिल यादव याला १० वर्षाचा सश्रम कारावास आणि 25 हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.