ठाणे: रंगोली साडीच्या दुकानाचा मालक याच्या सासऱ्याला फोन केल्याच्या संशयावरून कोरम मॉलमध्ये फिर्यादी बीपीन लालजी करीया (41) याला भेटण्यासाठी बोलावून त्याचे इनोव्हा कारमधून अपहरण करून येऊर येथील आरोपी रसिक बोरीच्या याच्या बंगल्यावर रसिक बोरीचा, अनिल फरिया, फरिया आणि बंगल्यावरील दोन इसम अशा पाचजणांनी लाकडी दांड्याने नग्न करून बेदम मारहाण केली. पोलिसात तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचजणांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपहरण, बेदम मारहाण आणि ठार मारण्याची धमकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ठाण्यातील प्रसिद्ध रंगोली साडी दुकानाचे मालक रसिक बोरीचा यांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कोरम मॉल येथे भेटण्यासाठी बोलवले: फिर्यादी बीपीन लालजी करीया (41) रा. नीलम नगर, बी.नं. 6 बी विंग रूम नं. 402, हरीओम स्वीट, मुलुंड, मुंबई (इस्ट) यांचा व्यवसाय आहे. घटनेच्या दिवशी सोमवारी (२२ मे) रोजी आपल्या कुटुंबासह स्कोडा कारने निवासस्थानी परतत असतानाच संध्याकाळी फिर्यादीचा चुलतभाऊ नितिन मुरजी फरीया याने फोन करून कोरम मॉल येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी फिर्यादीने शहापूर येथे असून सोबत कुटुंब असलयाचे सांगितले. संध्याकाळी ६ वाजता कोरम मॉल येथे भेटण्यासाठी येतो असे फिर्यादीने सांगितले. गाडी कॅडबरी कंपनी सर्विस रोडवरील सार्वजनिक स्वच्छालय येथे पार्क केली. गाडीत कुटुंब बसले होते. कोरोम मॉल येथे आलेल्या फिर्यादी करिया याला नितिन फरीया भेटला दोघे बोलत असतानाच इनोव्हा गाडी थांबली.
लाकडी दांडक्याने नग्न करून बेदम मारहाण: गाडीत चुलत भाऊ रसिक बोरीचा व एक इसम खाली उतरून ते दोघे आमच्या जवळ आले, तुझ्या कुटुंबाला माझा ड्राइव्हर घरी सोडेल तुझ्याशी बोलायचे आहे. असे सांगून कुटुंब घरी रवाना झाल्यानंतर जबरदस्तीने इनोव्हा गाडीत फिर्यादी बिपीन करिया याला कोंबले. त्यावेळी कारमध्ये अनिल फरीया, आजदिर फरीया आणि रसिक बोरीचा बसले आणि अपहरण करून येऊरच्या बोरचा याच्या बंगल्यावर नेले. त्याठिकाणी तू माझ्या सासऱ्याला फोन का केला म्हणून लाकडी दांडक्याने नग्न करून बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ बनविला. तर मारहाणीनंतर पुन्हा केडबरी जंक्शन येथे सोडले.
वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: पोलिसांवर गुन्हा न दाखल करण्यासाठी दबाव या संदर्भामध्ये गुन्हा दाखल होऊ नये यासाठी, मारहाण करणाऱ्यांनी दबाव देखील टाकला. मात्र तक्रारदाराच्या पाठपुराव्यामुळे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण केल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार केल्यास जीवे ठार मारू अशी धमकीही दिली होती. मंगळवारी (२३ मे) रोजी संध्याकाळी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी बिपीन करीया पोहचले. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात पाठविले. त्यानंतर डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार वर्तकनगर पोलीस ठाण्यात रसिक बोरीचा, अनिल फरिया, नितीन फरिया आणि बंगल्यावरील दोन इसम अशा पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. वर्तकनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा -