ठाणे - जर ठाण्यातील जनतेला पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकायचा असेल, तर त्यांनी 21 तारखेला कमळाचे बटण दाबा, असा अजब सल्ला उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी ठाणेकरांना दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - मुंबईचे गोरखपूर होते आहे - जितेंद्र आव्हाड
ठाणे मानपाडा भागात शनिवारी भाजपशी निगडित उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे शहर युतीचे उमेदवार संजय केळकर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मौर्य यांनी गेल्या 70 वर्षात देशाला किड लागली असल्याचे सांगत ती दूर करण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांनी केल्याचे सांगितले.
हेही वाचा - मनसेकडून ३६ किलोमीटर पायी फिरून होणार प्रचार; अविनाश जाधवांच्या 'इंजिन'ची मुसंडी
यावेळी मौर्य म्हणाले, पाकिस्तान नेहमीच भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देत असतो. या धमकीने सर्व जगास वेठीस धरण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. त्यांच्या या धमकीला चोख प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर आगामी निवडणुकीत जनतेने कमळाचे बटण दाबले की 2 अणुबॉम्ब टाकले जातील, 1 नापाक पाकिस्तानवर आणि दुसरा अनुच्छेद 370 ला विरोध करणाऱ्यांवर. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.