ठाणे - ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला ( Gram Panchayat Election in Thane ) आहे. बहुतांश ग्रामपंचायती निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरे आणि शिंदे गट तसेच राष्ट्रवादी, कॉग्रेस , मनसेचे पॅनल असे सर्व पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले ( All parties face each other ) आहे. अश्यातच भिवंडी तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या कवाड ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गटात ( Uddhav Thackeray vs BJP ) चुरशीची लढाई निर्माण झाल्याने दोघांमध्ये 'काटे कि टक्कर' यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाहवयास मिळाली आहे.
मतदानाचा हक्क बजावणार - भिवंडी - वाडा मार्गावर कवाड (खुर्द) ग्रामपंचायत असून एकूण तीन हजार पाचशे साठ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. कवाड ग्रामपंचायत हद्दीत पाच वार्ड असून एकूण ७ गावपाडे असून यापैकी तीन आदिवासी पाडे आहेत. भाजपने श्री सखाराम महाराज ग्राम विकास पॅनल हे नाव देऊन पाचही प्रभागात उमेदवार उभे केले आहे. तर सरपंचपद महिलांसाठी राखीव असलेल्या भाजपच्या पॅनलने मयुरी संदेश गुरव यांना सरपंच पदासाठी निवडणूक मैदानात उतरवले आहे. तर उद्धव ठाकरे गटाने आई गावदेवी परिवर्तन ग्राम विकास पॅनल नावाने पाच वार्डात उमेदवार उभे केले असून सरपंच पदासाठी उद्धव ठाकरे गटाकडून संजना सचिन शेलार ह्या निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.
रस्त्यांची बिकट अवस्था - ग्रापंचायत हद्दीतील प्रमख गावे मुख्य रस्त्याला जोडली असल्याने गावात रस्ते , वीज, पाण्याची सुविधा असल्याचे दिसून येते. मात्र आजही काही आदिवासी गाव पाड्यावर जाण्या येण्याच्या रस्त्याची बिकट अवस्था असून पाण्याची समस्या असल्याचे स्थानिक गावकरी सांगत आहेत. शिवाय स्मशानभूमीच काही पाड्यात नसल्याने उघडयावर अंतसंस्कार विधी उरकावे लागत असल्याचे गावकरी सांगत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भाजपचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश गुरव यांच्या पॅनलच्या कब्जात ग्रामपंचायत होती. यंदा मात्र उद्धव ठाकरे गटाकडून उभे असलेल्या आई गावदेवी परिवर्तन ग्राम विकास पॅनलने श्री सखाराम महाराज ग्राम विकास पॅनल समोर कडवे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे दोन्ही पॅनलकडून गावपाड्यात जोरदार प्रचार रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
शासनाच्या विविध योजनांमधून गाव-पाड्यांचा विकास - दरम्यान, ग्रामपंचायतला उपन्न घरपट्टीतुन सर्वाधिक मिळत असून ग्रामपंचायत हद्दीत लहान मोठे उद्योग व्यवसाय आहेत, शिवाय शासनाच्या विविध योजनांमधूनही गाव पाड्याचा विकास होतो, मात्र आजही काही पाड्यात नागरी समस्या जैसे थे असल्याचे दिसून येते असल्याने मतदार कोण्याच्या पारड्यात मतदान करतात हे निवडणुकीच्या निकाला नंतरच समोर येणार आहे.