ETV Bharat / state

मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणी 5 जण वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात

फेसबुकवर विरोधात पोस्ट टाकल्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. याबाबत वर्तकनगर पोलिसांनी 5 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

jitendra awhad facebook post issue
मंत्री जितेंद्र आव्हाड बंगल्यावर मारहाण प्रकरणी 5 जण वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Apr 9, 2020, 7:13 PM IST

ठाणे - मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची ओळख परेड करीत आरोपींच्या नावात गुप्तता बाळगण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मंत्री आव्हाड यांना सोशल मीडियावर धमकावणाऱ्या आणि अश्लील पोस्ट टाकणाऱ्या विरोधात कारवाई करावी, असे निवेदन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे. अटक पाचही आरोपींना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड बंगल्यावर मारहाण प्रकरणी पाचजण वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात
फेसबुकवर विरोधात पोस्ट टाकल्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. याबाबत वर्तकनगर पोलिसांनी 5 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर या पाचही आरोपींची ओळख परेड करण्यात येणार आहे. तर त्यांना न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेनंतर आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि धमकाविण्याचे मेसेज टाकण्यात आलेले आहेत. एकीकडे वैचारीक युद्ध चालू असताना निष्कारण अश्लील भाषेचा वापर करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतो. दुसरीकडे खून, बलात्कारासारख्या धमक्या दिल्या जातात. याच्याविरुद्ध कार्यकर्त्यांकडून उद्रेक झाला तर निष्कारण त्या कार्यकर्त्यांना दोष दिला जातो. तरी आपण याला वेळीच अटक करावी आणि तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.