ठाणे - दर दहा वर्षांनी बाप बदलणाऱ्यातले आम्ही नाही. मी एकदा काय नवी मुंबईत येऊन गेलो, तर गणेश नाईक थय-थय नाचू लागले आहेत. मी आणखी शंभर वेळा येणार. त्यामुळे नवी मुंबईकरांना गणेश नाईकांचा डान्सच बघायला मिळणार आहे, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर टीका केली आहे.
या झुल्यावरून त्या झुल्यावर उड्या मारणाऱ्या नाईकांनी नवी मुंबईतील आगरी समजासाठी काय केले, हे आता उघड करणार आहे, असेही आव्हाड म्हणाले.
हेही वाचा - 'ये तेरे बस की बात नही...तेरे बाप को बोल', गणेश नाईकांचे आव्हाडांना प्रत्युत्तर
गणेश नाईक हे खंडणीखोर आहेत. नवी मुंबईचे डॉन आहेत, असा गंभीर आरोप गृहनिर्माण मंत्री आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. या आरोपाला गणेश नाईकांनी फिल्मी स्टाईलने जोरदार प्रत्युत्तर दिले. 'ये तेरे बस की बात नही... तेरे बाप को बोल, असा टोला गणेश नाईकांनी लगावला होता. आता आव्हाड यांनी पुन्हा नाईकांना उत्तर दिले आहे. मी कुणाचे डायलॉग चोरत नाही, असेही आव्हाड म्हणाले.
येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापानगरलिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईत जोरदार तयारी केली जात आहे. विविध पक्षांच्या नेत्यांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे.