ठाणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी दैनदिन कामकाजासोबत आपआपले छंद जोपसण्याला प्राधान्य दिले. त्यात काही लोकांनी अनेक पुस्तक वाचली, काहींनी शैक्षणिक कोर्स पूर्ण केले. तर काहींनी आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव दिल्याचे आपल्या कानावर आले असेल. मात्र, यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे लॉकडाऊन काळात भारतात सर्वाधिक पॉर्न साईट पाहिल्या गेल्या आहेत. मानसोपचार तज्ञ आणि काही संशोधन अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्वच वयोगटातील व्यक्तींनी या लॉकडाऊनकाळात पॉर्नसाईट पाहण्यास रस दर्शविल्याचेही संशोधनात्मक अभ्यासातून समोर आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. यात काहींना घरात राहूनच कार्यालयीन कामकाज पहावे लागत होते. तर काही जण बेरोजगार ही झाले. मात्र, कामकाजाच्या तासानंतरही घराबाहेर पडता येत नसल्याने अनेकांनी आपले वेगवेगळे छंद जोपसणे पसंद केले. मात्र, वाचन लिखान, मनोरंजन या सर्वांतून कंटाळलेल्या अशा काही व्यक्ती आहेत की त्यांनी पॉर्न व्हिडिओ पाहण्याला पसंती दिली. या काळात जवळपास पाच लोकांमध्ये एक माणूस म्हणजेच २०% हे प्रमाण अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्यांचे असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारचे व्हिडिओ पाहणाऱ्यामध्ये या लॉकडाऊन काळात तब्बल १८.५ मिलियन लोकांची अधिकची भर पडल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
अश्लील व्हिडिओ पाहण्याचे तासही वाढले-
लॉकडाऊन काळात अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यासोबत, ते व्हिडिओ पाहण्याचा कालावधीही वाढला असल्याचे माहिती तज्ञांनी दिली आहे. हे प्रमाण २ तासावर गेले आहे. खासकरून जे एकटे आहेत त्यांच्यामध्ये पॉर्न साईड बघण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती या संशोधनातून समोर आली आहे. या लॉकडाऊन काळात अनेक नवीन लोकांचे या पॉर्न व्हिडिओ पाहण्याकडे कल वाढल्याचेही संशोधनात म्हटले आहे.
जास्त पॉर्न व्हिडिओ पाहण्यामुळे अनेक मानसिक आजार वाढणे, चिंता वाढणे, शरीराकडे लक्ष न देणे त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. चिडचिड वाढण्यासारखे मानसिक आजार होत असल्याचेही तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे या लॉकडाऊन मध्ये जोडप्यांमध्ये शारीरिक संबंधांचे प्रमाण १.९ ते २.४ वाढले आहे. त्यामुळे मुलांचे जन्माला येण्याचे प्रमाणही वाढले आहे. तर दुसरीकडे सतत घरात राहून अनेक जोडप्यांमध्ये भांडणाच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. त्यामुळे नेट युजर्स पॉर्न व्हिडिओ पाहण्याकडे वळत अशल्याचे संशोधतातून समोर आले आहे. याच बरोबर या काळात व्हिडिओ कॉलिंग आणि मॅसेजच्या माध्ममातून देखील सेक्स्युल अॅक्टिव्हिटी वाढल्या असल्याचीही माहिती समोर आली आहे.
मानसोपचाराची गरज
या बाबत काही लोकांना विचारणा केली असता, हो आम्ही नाटक, फिल्म व सिरीयल पाहून वैतागलो होतो आणि त्यामुळे मी व माझे मित्र पॉर्न व्हिडिओ पाहण्याकडे वळालो, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. लॉकडाऊन काळात लोकांची मानसिकता, एकाग्रता बदलत चालली आहे. त्यामुळे काही मानसोपचार तज्ञांनी लॉकडाऊन काळात लोकांचे समुदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली होती. त्यात ही तरुण मुलांचे कॉल येऊन आम्ही पॉर्न खूप बघतो, आम्ही आता काय करावे, असा या बाबत सल्लाही घेतला असल्याचेही या संशोधनातून पुढे आले. मात्र या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी नागरिकांना समुदेशन आणि मानसोपचाराची गरज अशल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी व्यक्त केले आहे.