ETV Bharat / state

ठाणे : हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज लागत असल्याने, राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील  कोविड पार्किंग प्लाझा रुग्णालयात, ठाणे महापालिकेच्या वतीने हवेतून स्वयंचलित ऑक्सिजन  निर्माण करणारा प्लांट तयार करण्यात आला आहे. या प्लांटचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

author img

By

Published : May 1, 2021, 10:17 PM IST

ठाणे - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज लागत असल्याने, राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोविड पार्किंग प्लाझा रुग्णालयात, ठाणे महापालिकेच्या वतीने हवेतून स्वयंचलित ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांट तयार करण्यात आला आहे. या प्लांटचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रकारेचे आणखी चार प्लांट ठाणे महापालिका हद्दीत लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक कोरोनाबाधितांना सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात या प्रकारचे ऑक्सिजन प्लांट उभारावे लागणार आहेत. लसीकरणाबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, सध्या राज्यात लसींचा तुटवडा आहे. ज्या प्रमाणात राज्याला लस मिळेल तसे आपण लसीकरण करू, नागरिकांना रेमडेसिवीरचा वापर हा आवश्यकता असेल तरच करावा. कोणीही कोरोनावरून राजकारण करता कामा नये, असं देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

विरार प्रकारणाची चौकशी सुरू

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीबाबत चौकशी सुरू आहे. काहींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्यांची देखील चौकशी सुरू आहे. तसेच मुंब्रा मधील प्राईम केअर प्रकरणात देखील चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात जे दोषी निघतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं देखील यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - राजवाडीत 14 ते 44 वयोगटातील 200 लाभार्थ्यांचे प्रतिकात्मक लसीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.