ठाणे - भिवंडी तालुक्यातील अकलोली गावाच्या हद्दीतील पेंढारीपाडा येथे राहणाऱ्या वयोवृद्ध पती पत्नीची राहत्या घरातच निर्घृण हत्या ( Husband-Wife Murder in thane ) केल्याची घटना समोर आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे भिवंडी तालुक्यात ( Double Murder in Bhiwandi ) एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी उच्च अधिकाऱ्यांच्या भेटी _
जगन्नाथ उर्फ बाळू काळु पाटील, वय 83 व सत्यभामा जगन्नाथ पाटील वय 80 असे हत्या झालेल्या पतीपत्नींची नावे आहेत. भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वज्रेश्वरी अकलोली येथील पेंढरी पाडा या ठिकाणी घटना घडली आहे. गणेशपुरी पोलिसांसह उपअधीक्षक विलास नाईक, पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हत्याकांडावेळी घरातील टीव्ही सुरुच -
बाळू पाटील आणि त्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती गणेशपुरी पोलीस पथकाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. दोघांचेही शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्याकांडावेळी घरातील टीव्ही सुरु होता. दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा - Nude Dance Nagpur : सकाळी शंकरपट, रात्री 'आशिक बनाया अपने'; डान्स हंगामाने उडाली खळबळ