ठाणे: अश्विन निकुंभ (वय ३२) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. निकुंभ कुटूंब बदलापूर पूर्वेकडील शिरगांव भागातील माऊली चौकातील एका इमारतीमध्ये राहतात. सोमवारी रात्री पत्नी कोमल (वय २२) ही किचन मध्ये जेवणाची तयारी करत होती. त्यावेळी त्यांच्या सासूने 'चपाती चांगली बनवशिल का?' (over making chapati) असा प्रश्न विचारातच सासू सुनेही मी चांगलीच चपाती बनवते. असे बोलताच दोघीत शाब्दिक वाद झाला.
हा वाद ऐकून पती अश्विनने पत्नी कोमलच्या डाव्या कानशिलात जोरदार झापड मारली. त्यामुळे पत्नीच्या कानाचा पडदा फाटला आहे. (Husband tore his wifes ear) यावेळी त्याने तीला पट्ट्यानेही मारहाण केली. त्यानंतर हे भांडण पोलीस ठाण्यापर्यत गेले दरम्यान पत्नी कोमलच्या तक्रारीवरून पती अश्विन विरुध्द भादंवि. कलम ३२५, ३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एच . एम . कुळकर्णी करीत आहेत.