ETV Bharat / state

Increase Sales Chillum In Thane : ठाण्यात शेकडो किलो गांजावर कारवाई; तरीही चिलीम विक्रीला 'अच्छे दिन' - ठाण्यात चिलीम विक्रीला अच्छे दिन

अनलॉक पासून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, असे असताना गांजा ओढण्यासाठी लागणारी चिलीम विक्रीत ऑनलाईनसह कुभांरवाड्यात वाढ झाली ( Increase Sales Chillum In Thane ) आहे.

Chillum
Chillum
author img

By

Published : May 28, 2022, 4:51 PM IST

ठाणे - अनलॉक पासून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, असे असताना गांजा ओढण्यासाठी लागणारी चिलीम विक्रीत ऑनलाईनसह कुभांरवाड्यात वाढ झाली आहे. अंमली पदार्थ असलेल्या गांजा ओढण्यासाठी चिलीमचा वापर केला जातो. यामुळे एकीकडे पोलीस कारवाईत शेकडो किलो गांजा पकडूनही चिलीम विक्रीला अच्छे दिन आल्याचे दिसून आले ( Increase Sales Chillum In Thane ) आहे.

भिवंडीत प्रत्येक आठवड्याला सुमारे ५०० चिलीम विक्री - भिवंडीत कामगारांची मोठ्या संख्येने वस्ती आहे. तर कल्याण, डोंबिवली उल्हासनगर, अंबरनाथ शहरात औद्योगिक कारखाने असल्याने या ठिकाणी बहुतांश कामगारांची परप्रांतात असलेली गांजा ओढण्यासाठी सवय आहे. पूर्वीपासून नशेसाठी गांजा हा अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी चिलीमचा उपयोग केला जात आहे. वास्तविक गांजाच्या नशेला राज्य सरकारने बंदी घातलेली आहे. त्यामुळे भिवंडीसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ शहरात दररोज गांजा पिणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहे. परंतु या शहरांत ना गांजाचे प्रमाण कमी झाले ना ओढण्याऱ्यांचे. त्यातच कुंभारांकडे विकत मिळणाऱ्या चिलीमची विक्री कमी झालेली नाही. भिवंडीत प्रत्येक आठवड्याला सुमारे ५०० चिलीम विक्री होत आहेत. या चिलीम स्वस्त असल्या तरी या शिवाय गांजा सेवन केले जात नाही. अनेकवेळा मातीची चिलीम नाजूक असल्याने त्या तुटतात. शासनाने सिगारेट पिण्यासाठी झोन केल्याने विडी सिगारेट सार्वजनिक ठिकाणी पिता येत नाही. त्यामुळे अनेक कामगार आपल्या कामाचा शिण घालविण्यासाठी गांजाची नशा करताना आढळतात.

कुंभारवाड्यातील चिलीम तयार करणाऱ्यांशी संवाद साधताना प्रतिनीधी

ऑनलाईन चिलीम विक्रीमुळे कुंभाराच्या व्यवसायावर परिणाम - यापूर्वी कल्याणाच्या कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात चिलीमची विक्री होत असे. पण, ऑनलाईन चिलीम विक्रीमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे कुंभारवाड्यातील महिलेने सांगितले. कुंभारवाड्यात २० रुपया पासून ५० रुपयांपर्यत चिलीम विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, अलिकडच्या काळात १० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यत ऑनलाईन चिलीम सहज उपलब्ध होते. यामध्ये ४ इंच पितळी चिलीम ६०० रुपये तर मारबलची ५०० रुपयांना विक्रीसाठी ऑनलाईनवर उपलब्ध आहे. पण, १० रुपयांत ऑनलाईन चिलीम मिळत असल्याचे त्याचा कुंभाराच्या विक्रीवर परिमाण झाला आहे.

दीड वर्षात ५०० किलोच्या जवळपास गांजा जप्त - अनलॉक काळापासूनच्या दीडवर्षात कल्याण, डोंबिवली व भिवंडी शहरातून ५०० किलोच्या जवळपास पोलिसांच्या कारवाईत गांजा जप्त केल्याचे समोर आले. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने डिसेंबर २०२१ मध्ये शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम हसन उर्फ रजा अन्सारी या तस्कराच्या घरावर छापा मारून ७५ किलो गांजा जप्त करून त्याला बेड्या ठोकल्या होत्या. तर ऑक्टोंबर २०२१ मध्ये भोईवाडा पोलिसांनी एका टेम्पोमधून ३२ किलो ५३७ ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. तसेच, एप्रिल २०२२ मध्ये शांतीनगर पोलिसांनी ७ किलो ७५० ग्राम गांजा जप्त करून तस्करांना अटक केली. तर, कोनगाव पोलिसांनी डिसेंबर २०२० मध्ये नाशिक -मुंबई महामार्गावर आठ किलो गांजा जप्त केला होता.

कल्याण डोंबिवलीतूनही गांजा जप्त - धुळ्याच्या जंगलात पिकवलेला २० किलो गांजा जानेवारी २०२२ मध्ये डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी जप्त केला. तर, मार्च २०२२ मध्ये गुजरातमधून आलेला १०० किलो गांजा कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी जप्त करून तस्कर विजय पटेल याला बेड्या ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी पुन्हा एकदा धुळ्याच्या जंगलात पिकवलेला ५ किलो ६०० ग्राम गांजा डोंबिवलीतून जप्त केला, गांजाची विक्री विद्यार्थ्यांना होत असल्याचे समोर आले. तर डिसेंबर २०२० मध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने ११६ किलो गांजासह महिला तस्कर उषा पाटील हिला साथीदारांसह अटक केली होती.

रेल्वेतूनही गांजाची तस्करी - कल्याण रेल्वे जंक्शन असल्याने या स्थानकातूनच कल्याण, डोंबिवली भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर मधील लाखो प्रवाशी मेल एक्स्प्रेसमध्ये येण्यासाठी - जाण्यासाठी कल्याण जंक्शनवर येत असतात. यामुळे रेल्वे स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. त्यातच सप्टेंबर २०२१ मध्ये कोणार्क एक्स्प्रेसमधून २१ किलो गांजा लोहमार्ग मार्ग पोलिसांनी जप्त केला होता. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये भुवनेश्वर एलटीटी एक्स्प्रेसमधून ५५ किलो ३९५ ग्राम वजनाचे २६ बंडल जप्त केले होते.

गांजा ओढण्यावरून उल्हासनगरमध्ये खून - उल्हासनगर शहराची उद्योग नगरी म्हणून देशभरात ओळख आहे. याच शहरातील कॅम्प नंबर ५ भागातील साईनाथ कॉलनी समोरील रस्त्यावर २ फेब्रुवारी २०२२२ रोजी गांजा ओढण्यावरून फहीम नावाच्या तरुणाचा खून झाला होता. त्यावेळी हिललाईन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती.

गांजाचे सेवन शेकडो लोकांवर कारवाई - ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड महिन्यापांसून गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अलाउट ऑपरेशन राबविण्यास सुरवात केली आहे. आतापर्यत जिल्ह्यातील शहरी भागात तीन वेळा अलाउट ऑपरेशन राबवून पोलिसांनी गांजाचे सेवन शेकडो लोकांवर कारवाई केली आहे. यापुढेही गांजा ओढणाऱ्या नशेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा - Shanishingnapur Devasthan : शनिमंदिरात 'या' चार वस्तूंवर बंदी; शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा निर्णय, भाविकांनी केले स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.