ठाणे - गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. ते ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घराबाहेर जल्लोष केला. तसेच त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यावेळी आव्हाड यांनी खिडकीतून हात दाखवत तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले.
ठाण्यामध्ये गोरगरीबांची सेवा करताना जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांवर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या जवळच्या मित्रांचे फोन मागील पंधरा दिवसांपासून वाजत आहेत. मात्र, पूर्णपणे आव्हाड यांचा संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या माहितीवरच कार्यकर्त्यांना समाधान मानावे लागत होते. रविवारी जितेंद्र आव्हाड यांनी घराबाहेर येऊन त्यांना पाहायला आलेल्या सर्व कार्यकर्ते मित्रांना खिडकीतून हात दाखवत तब्येत ठिक असल्याचे सांगितले. त्यांना त्यांचा मोबाईल चालू करून पुन्हा काम सुरू केले आहे. कार्यकर्त्यांशी संपर्क करत आहेत. आवाज बसल्यामुळे बोलताना त्रास होतो. मात्र, जिद्द कमी होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आव्हाडांच्या शरीरयष्टीमधे झाला मोठा बदल -
मागील अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आव्हाड यांच्या शरीरयष्टीमधे मोठा बदल झालेला दिसून येत आहे. वाढलेली दाढी आणि केस बारीक झालेले जितेंद्र आव्हाड हे पटकन कार्यकर्त्यांना ओळखताच आले नाही. मात्र, काही दिवसानंतर आव्हाड यांच्या प्रकृतीत झालेला बदल दिसून आला