ETV Bharat / state

ठाण्यात 'काळा दिवस'ला हॉटेल, व्यावसायिकांचा पाठिंबा - ठाणे बातम्या

ठाण्यामध्ये कर्नाटकातील काही रहिवाशी आणि हॉटेल व्यावसायिकांनी महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देत शिंदे यांना निवेदन दिले. हॉटेल व्यावसायिक देखील यावेळी काळी फीत लावून आले होते.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Nov 1, 2020, 7:01 PM IST

ठाणे - बेळगाव सीमाप्रश्नी आज (१ नोहेंबर) राज्य सरकारमधील सर्व मंत्रिमंडळाने काळा दिवस पाळला असून काळी पट्टी बांधून काम केले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काळी फित लावून कामकाज केले. ठाण्यामध्ये कर्नाटकातील काही रहिवाशी आणि हॉटेल व्यावसायिकांनी महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देत शिंदे यांना निवेदन दिले. हॉटेल व्यावसायिक देखील यावेळी काळी फीत लावून आले होते.

ठाण्यात 'काळा दिवस'ला हॉटेल, व्यावसायिकांचा पाठिंबा

न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरुच राहणार

सीमाप्रश्नाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी लोकांवर अन्यायकारक वागणूक कर्नाटक सरकार देत असून याबाबतदेखील शिंदे यांनी निषेध व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणाबाबत या सरकारला पूर्ण पाठिंबा असून ही न्यायालयीन लढाई आहे. परंतु, न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून हे दुर्दैवी आहे. तर याबाबत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरुच राहणार ही लढाई राज्य सरकार जिकेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे दीपक केसरकर आणि विजय वडेट्टीवारांना याबाबत विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. सद्या आज काळा दिवस असून त्याबाबत आपण बोलू म्हणून केसरकर आणि वडेट्टीवारांबाबत बोलणे टाळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.