ठाणे - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात सोमवारी प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करणाऱ्या अर्सेनिक अल्बम या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
देशातील सद्यपरिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. दररोज हजारो लोकांना कोरोनाची बाधा होत असून शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. आयुष मंत्रालय ने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप नागरिकांना करण्याची अनुमती देताच स्वामी फाउंडेशनचे महेश कदम यांनी सोमवारी ठाण्यात हजारो लोकांना गोळ्यांचे मोफत वाटप केले.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हा वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. जवळपास दहा हजार गोळ्यांचे वाटप करण्याचा संकल्प कदम यांनी केला आहे. नागरिकांनी या संधीचा फायदा सोशल डिस्टनसिंगचे पालन करत घ्यावा असे आवाहन कदम केले. या गोळ्यांनी कोव्हिड-१९ बरा होत नाही. मात्र, शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते जेणेकरून कोरोनाशी लढताना बळ मिळते, असे देखील कदम यांनी यावेळी सांगितले.