ठाणे : मुंबई येथील इस्लामिक जिमखाना, मरीन लाईन्स येथे 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी होणारा 'इंटरनॅशनल हलाल शो इंडिया' विरोधात हिंदू जनजागृती समिती (HJS Oppose International Halal Show India) आक्रमक झाली असून समितीच्यावतीने हलाल सक्ती विरोधी कृती समिती (Anti Halal Forced Action Committee) स्थापन करून विरोध केला. आज सायंकाळी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करुन हा 'इंटरनॅशनल हलाल शो इंडिया' रद्द करण्याची मागणी (demand cancellation of International Halal Show India) करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात (HJS protests against International Halal Show India) आल्या. पोलीस आणि शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. Latest news from Thane
समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती का?
भारत सरकारच्या अधिकृत 'FSSAI' आणि 'FDA' या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असताना वेगळ्या हलाल प्रमाणिकरणाची गरजच काय ? असा प्रश्न यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधीकडून उपस्थित करण्यात आला. तसेच भारतातील 15 टक्के मुसलमान समाजासाठी 80 टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, असे या आंदोलनाच्या वेळी स्पष्ट करण्यात आले.
हिंदू व्यापाऱ्यांना हलाल प्रमाणपत्र घेण्याची सक्ती- गेल्या काही काळापासून भारतात हेतुतः 'हलाल' उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी 'हलाल प्रमाणपत्र' घेण्याची सक्ती केली जात आहे. याच हलाल उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्लॉसम 'इंडिया' या संस्थेने हा 'इंटरनॅशनल हलाल शो इंडिया' आयोजित केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दादर, घाटकोपर आणि धारावी या ठिकाणी हलाल सक्ती विरोधी कृती समितीने बैठका घेऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस आयुक्त यांना निवेदन, आंदोलने, भव्य मोर्चा, सोशल मिडियाद्वारे जनप्रबोधन आदी माध्यमांद्वारे या 'इंटरनॅशनल हलाल शो'ला जोरदार विरोध करण्याचा निर्धार केला आहे.