ETV Bharat / state

बारबालांच्या छुप्या खोल्यांवर पालिकेचा 'हातोडा'; मात्र कल्याण-भिवंडीत 'जैसे थे'

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ऑर्केस्ट्रावरील बंदी उठवल्यानंतर अनेक ठिकाणी अवैध डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर उल्हासनगर महापालिकेने ऑर्केस्ट्रा-बार मधील बारबालांच्या छुप्या खोल्यांवर कारवाई केली.

author img

By

Published : Feb 27, 2020, 11:27 PM IST

thane dance bar news
उल्हासनगर महापालिकेने ऑर्केस्ट्रा-बार मधील बारबालांच्या छुप्या खोल्यांवर कारवाई केली.

ठाणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ऑर्केस्ट्रावरील बंदी उठवल्यानंतर अनेक ठिकाणी अवैध डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर उल्हासनगर महापालिकेने ऑर्केस्ट्रा-बारमधील बारबालांच्या छुप्या खोल्यांवर कारवाई केली.

डान्सबार बंदीच्या काळात ठाणे पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील महापालिकांना बारबालांना लपवण्यासाठी उभारलेल्या खोल्या उद्ध्वस्त करण्याचे आदेश 2014 साली देण्यात आले होते. यानंतर अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. तसेच पालिकेने देखील या छुप्या खोल्यांवर हातोडा चालवला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ऑर्केस्ट्रा बार चालवण्यासाठी पुन्हा परवानगी दिली; आणि अनेक ठिकाणी अवैधपणे बार सुरू झाले. यामध्ये नियमानुसार ठरलेल्या बारबालांपेक्षा अधिक बारबालांना आसरा देण्यात आला. तसेच त्यांच्यासाठी छुप्या खोल्या तयार करण्यात आल्या. या खोल्यांवर उल्हासनगर महापालिकेने हातोडा चालवला आहे. या ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरू असून अश्लील प्रकार सुरू असल्याचे अनेकदा पोलिसांच्या छापेमारीत समोर आले आहे. तसेच हे डान्सबार गुन्हेगारीचे केंद्र बनत आहेत. यामुळे कारवाईची मागणी होत होती.

श्रीराम चौकात असलेल्या अॅप्पल बार, नाईनटी डिग्री बार, राखी बार, अचल बार, चांदणी बार, हँड्रेट-डे बार अश्या ऑर्केस्ट्रा बारवर पालिकेने कारवाई केली आहे. तसेच अतिक्रमण विभागाच्या मदतीने या ठिकाणी उभारण्यात आलेल्या छुप्या खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या.

कल्याण पोलीस परिमंडळ-३ च्या हद्दीत सुमारे १०० ऑर्केस्ट्रा-बार

कल्याण डोंबिवली शहर व लगतच्या ग्रामीण परिसरात सुमारे १०० ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बार आहेत. अनेक बार मालकांनी महापालिकेची परवानगी न घेता बेकायेशीरपणे बार चालवले आहेत. तसेच या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून बारबाला लपवण्यासाठी छुप्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाने गठीत केलेल्या या समितीने या भागाची पाहाणी करून पोलीस प्रशासनाला ६ डिसेंबर २०१४ ला अहवाल सादर केला होता. मात्र ६ वर्षांचा कालवधी उलटूनही ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बारच्या अनधिकृत बांधकामांचा विषय अद्याप सुरूच आहे. संबंधित पथकाने त्यावेळी महापालिका हद्दितील २८ ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बारची प्रत्यक्षात पाहणी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये काही बारमध्ये स्टोअर रूम, गोडाऊन, महिलांचे मेकअप रूम, विश्रांतीची खोली असल्याचे आढळून आले.

भिवंडी पोलीस परिमंडळ-२ हद्दीत सुमारे २३ ऑर्केस्ट्रा-बार

भिवंडी पालिका हद्दीत चार तर ग्रामीण भागातील मुंबई–नाशिक महामार्गावर व गोदाम पट्ट्यात जवळपास १९ डान्सबार आहेत. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना, अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी डान्स बारचा समावेश आहे. मात्र, याठिकाणी पालिकेच्या हद्दीतील बारच्या छुप्या खोल्यांवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. महापालिका हद्दीतील ४ डान्स बार पैकी २ डान्स बार धोकादायक इमारतीत सुरू आहेत. मात्र, भिवंडी पालिकेने यावर कारवाई केल्याचे ऐकीवात नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.