ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सखल भाग जलमय; दुकाने, घरांमध्ये शिरले पाणी - Varna

शुक्रवारी सायंकाळपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर नाले सफाई न झाल्याने त्यातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे. शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला होटेल, नारपोली, पद्मा नगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले आहे.

दुकानामध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे छायाचित्र
author img

By

Published : Aug 3, 2019, 11:04 AM IST

ठाणे - भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बहुतांश घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांचे हाल होत आहे.

मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाल्याची दृष्ये

काल सायंकाळपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर नाले सफाई न झाल्याने त्यातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे. शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला होटेल , नारपोली, पद्मा नगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले आहे. पावसामुळे निजामपुरा पोलीस चौकीत देखील पाणी शिरले. तर पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूर फाटा- रांजनोली बायपास नाका, वंजारपट्टी नाका, नारपोली अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

तर मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहने संथ गतीने जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वारणा, कामवारी, तानसा या नद्यांना पूर आला असून या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी ईदगहा रोड येथील कामवारी नदी काठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांनी दुसरीकडे स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला आहे.

Intro:319 किट नंबर

Body:मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सखल भाग जलमय; बहुतांश दुकाने घरांमध्ये शिरले पाणी

ठाणे : भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातील भागातभागात पाणी शिरून जलमय झाला आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बहुतांश घरा व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे,
काल सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस रात्र भर पडत आहे संततधार पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला तर सकाळी पावसामुळे गटारे नाले सफाई न झाल्याने त्यातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे, शहरातील निजामपुरा ,कनेरी, कमला होटेल ,नारपोली, पद्मा नगर ,तीन बत्ती ,शिवाजी नगर ,भाजी मार्केट ,नजराना कंपाउंड सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले तर निजामपुरा पोलीस चौकीत पाणी शिरले, तर पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजुर फाटा- रांजनोली बायपास नाका , वंजारपट्टी नाका , नारपोली अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली , तर मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहने संथ गतीने जात आहे ,त्यामुळे प्रवाशांना वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वारणा , कामवारी , तानसा या नद्यांना पूर आला असून या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे , त्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर महानगरपालिका हद्दीतील महाडा कॉलनी ईदगहा रोड या कामवारी नदी काठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांनी दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे,
( बातमी साठी व्हिजवल व्हाट्सएपवर पाठवले")
mh_tha_1_ren_bhiwandi_4_vis_mh_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.