ETV Bharat / state

Har Har Mahadev show : हर हर महादेव शो आव्हाडांनी पाडला बंद; मनसेने केला पुन्हा सुरू - हर हर महादेव शो आव्हाडांनी पाडला बंद

हर हर महादेव या मराठी चित्रपट ( Har Har Mahadev Marathi Movie ) सद्या चर्चेचा विषय बनला असून हा शो ठाण्यात सुरू असताना बंद करण्यात आला. या प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव ( MNS leader Avinash Jadhav) या ठिकाणी मॉल मध्ये पोहचले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा शो सुरू केला आणि आता शो बंद करून दाखवण्याचे आव्हान राष्ट्रवादी ला दिले.

Har Har Mahadev show
हर हर महादेव मराठी चित्रपट
author img

By

Published : Nov 8, 2022, 10:00 AM IST

Updated : Nov 8, 2022, 11:02 PM IST

ठाणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या इतिहासाची तोडफोड करणाऱ्या चित्रपटा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awad ) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव या मराठी चित्रपट ( Har Har Mahadev Marathi Movie ) चर्चेचा विषय बनला असून हा शो ठाण्यात सुरू असताना बंद करण्यात आला. या प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव (MNS leader Avinash Jadhav ) या ठिकाणी मॉलमध्ये पोहचले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा शो सुरू केला आणि आता शो बंद करून दाखवण्याचे आव्हान राष्ट्रवादीला दिले. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटकदेखील करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रेक्षकगृहात घुसून शो थांबण्याची विनंती : ठाण्याच्या विवियाना मॉल मध्ये आमदार जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे कार्यकर्ता यांनी हर हर महादेव चित्रपट शो बंद पाडला. हर हर महादेव हा शो रात्री १० वाजता सुरू होता. याचवेळी शो सुरू असताना स्वतः आव्हाड यांनी प्रेक्षकगृहात घुसून शो थांबण्याची विनंती केली, यावेळी प्रेक्षक आणि कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत देखील झाले असल्याचे पाहायला मिळाले.

हर हर महादेव मराठी चित्रपट

इतिहासाची मोडतोड सहन करणार नाही आव्हाड : इतिहासाची तोडफोड सहन केली जाणारं नाही, काहीही करून इतिहास बडल्याचे प्रयत्न सुरू असून ते आम्ही हाणुन पडल्याशिवाय राहणार नाही. असे यावेळी आव्हाड यांनी सांगितले. चित्रपट हा पुढील तरुणाचे भविष्य घडवण्याचा साधन आहे. हे वेळीच रोखले पाहिजे हे आमचे म्हणणे आहे. चित्रपट निर्माण करणारे दिग्दर्शन यांनी त्वरित थांबवावे अशी विनंती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

एवढ्या उशिराने जाग आलेल्या राष्ट्रवादीची मुजोरी सहन करून घेणार नाही : सिनेमे रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत आणि सात दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शो बंद पाडणे ही मजुरी असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. नाहक प्रेक्षकांना मारहाण केल्यामुळे ही माजोरी आपल्याला पाहायला मिळाल्याचे अविनाश जाधव यांनी सांगत जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी देखील केली.

भोंग्यानंतर मनसे राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमने-सामने : मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि मनसे एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा माशिदींवरील भोंगे आणि अजाणीवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. तेव्हा राष्ट्रवादी आणि मनसे एकमेकांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने मनसे आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात आमने-सामने आले आहेत.

Last Updated : Nov 8, 2022, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.